शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

हमासच्या तळांवर इस्रायलचा हल्ला, पुन्हा तणाव वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2017 12:52 IST

हमास या दहशतवादी संघटनेच्या पॅलेस्टाइनमधील अनेक तळांवर इस्रायलने हल्ले केले आहेत. हल्ला करण्यात आलेल्या तळांमध्ये शस्त्रास्त्रांचा कारखाना आणि शस्त्रांच्या गोदामाचा समावेश असल्याचे इस्रायली लष्कराने स्पष्ट केले आहे

ठळक मुद्देगाझामधील संतप्त लोकांच्या जमावावर इस्रायली फौजांनी शुक्रवारी केलेल्या गोळीबारामध्ये दोन पॅलेस्टाइन नागरिकांचा मृत्यू झाला आहे.हमासच्या तळांवर केलेल्या हल्ल्यांमध्ये 25 लोक जखमी झाले आहेत.

जेरुसलेम- हमास या दहशतवादी संघटनेच्या पॅलेस्टाइनमधील अनेक तळांवर इस्रायलने हल्ले केले आहेत. हल्ला करण्यात आलेल्या तळांमध्ये शस्त्रास्त्रांचा कारखाना आणि शस्त्रांच्या गोदामाचा समावेश असल्याचे इस्रायली लष्कराने स्पष्ट केले आहे. इस्रायलच्या दक्षिण भागामध्ये काल गाझामधून रॉकेटस डागण्यात आली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने हमासच्या तळांवर हल्ले केले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता दिल्यानंतर मध्य-पूर्वेतील तणाव वाढीला लागला आहे. इस्रायलने जेरुसलेमला नेहमीच आपली राजधानी मानले आहे. तर पॅलेस्टाइनने पूर्व जेरुसलेमला आपली राजधानी मानले होते. 1967 साली झालेल्या युद्धामध्ये इस्रायलने पूर्व जेरुसलम जिंकून घेतले होते. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये नेहमीच तणावाची स्थिती राहिली आहे. ट्रम्प यांनी हा निर्णय घेतल्यामुळे यावर पुन्हा चर्चा सुरु होऊन मध्यपूर्वेतील स्थिती बिघडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या सदस्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये बहुतांश देशांनी ट्रम्प यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली असून संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला एकाकी पाडले आहे..गाझामधील संतप्त लोकांच्या जमावावर इस्रायली फौजांनी शुक्रवारी केलेल्या गोळीबारामध्ये दोन पॅलेस्टाइन नागरिकांचा मृत्यू झाला आहे तसेच हमासच्या तळांवर केलेल्या हल्ल्यांमध्ये 25 लोक जखमी झाले आहेत. शनिवारी इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमुळे पॅलेस्टाइनचे किती नुकसान झाले याबाबत अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही. तसेच एक रॉकेट इस्रायलने पाडल्याची माहिती मिळाली आहे.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयIsraelइस्रायलUSअमेरिकाAmericaअमेरिका