शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

गाझातील हॉस्पिटलवर इस्रायलचा हवाई हल्ला; 500 जणांचा मृत्यू, जॉर्डनने बायडेन यांचा दौरा रद्द केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 06:08 IST

इस्रायलसाठी बायडेन युद्धभूमीत, युद्ध निवळण्याची शक्यता; रशियाचा शस्रसंधीचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रात फेटाळला

गाझा शहरातील हॉस्पिटलवर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात किमान 500 लोक ठार झाले आहेत. हल्ल्याच्या वेळी शेकडो लोक अल-अहली रुग्णालयात आश्रय घेत होते. या घटनेचा हमासने वॉर क्राईम असा उल्लेख करत जगातील देशांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. तर इस्रायलने तो हल्ला आपण केलेला नसून हमासनेच ऱॉकेट डागल्याचे म्हटले आहे. 

दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे जॉर्डन दौऱ्यावर जाणार आहेत. परंतू, त्यापूर्वीच त्यांनी इस्रायलला भेट देणार असल्याचे जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर जॉर्डनने बायडेन यांच्यासोबतची बैठक रद्द केली आहे. दहशतवादी संघटना हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलला पाठिंबा देण्यासाठी, पुढे काय पावले उचलावीत, यावर चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन बुधवारी इस्रायलला भेट देणार असल्याची माहिती व्हाइट हाउसने दिली. दुसरीकडे इस्रायल-हमास संघर्षाबद्दल रशियाने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये मांडलेला शस्त्रसंधीचा प्रस्ताव फेटाळण्यात आला. या प्रस्तावामध्ये रशियाने हमासच्या हल्ल्यांचा उल्लेख न करण्याचा खोडसाळपणा केला होता.

दरम्यान, इस्रायल-हमास युद्धाच्या ११ व्या दिवशीही दक्षिण गाझामध्ये तीव्र बॉम्बवर्षाव सुरूच आहे. सततच्या हल्ल्यांमुळे गाझामधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गाझातून पळून जाण्याचा प्रयत्न करणारे हजारो लोक रफाह येथे जमले आहेत. तेथून इजिप्तला जाणारा मार्ग आहे. परदेशी पासपोर्ट असलेल्या निर्वासितांना मदत करण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी मध्यस्थ करारासाठी दबाव आणत आहेत.

कुणाचे समर्थन? चीन, गॅबॉन, मोझांबिक, रशिया, यूएईकुणाचा विरोध? फ्रान्स, जपान, ब्रिटन, अमेरिका

इस्रायल, लेबनॉन सीमेवर संघर्षलेबनॉन आणि इस्रायलच्या सीमेवर मंगळवारी पुन्हा संघर्ष सुरू झाला. मंगळवारी सकाळी लेबनॉनने उडवलेले रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र उत्तर इस्रायलमधील मेतुला येथे पडले आणि तीन जण जखमी झाले.

हमासची क्रूरता व्हायरल हमासने इस्रायली नागरिकांची अतिशय क्रूरपणे हत्या केली. त्याची भीषणता दाखविणारा व्हिडीओ इस्रायलने जारी केला. त्यात हमासने एका बालकाला जिवंत जाळले, एकाचा शिरच्छेद करत होते, असे व्हिडीओत दाखवले आहे.

मदतीसाठी १३ हजार स्वयंसेवकपॅलेस्टिनीमधील निर्वासितांच्या मदतीसाठी युनायडेट नेशन्स रिलिफ अँड वर्क्स एजन्सी (यूएनआरडब्ल्यूए) या संस्थेचे सुमारे १३ हजार स्वयंसेवक सध्या गाझा परिसरात सक्रिय आहेत. त्यात डॉक्टर, शिक्षक, नर्स आदींचा समावेश आहे.

हमासच्या कमांडरचा खात्माइस्रायलने मंगळवारी हमासच्या आणखी एका कमांडरचा खात्मा केल्याची माहिती इस्रायलच्या संरक्षण विभागाने दिली. अयमान नोफाल असे त्याचे नाव असून तो सेंट्रल ब्रिगेडचा कमांडर तसेच लष्करी गुप्तचर विभागाचा प्रमुख होता. 

टॅग्स :Israel Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धJoe Bidenज्यो बायडन