शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

'इस्रायलला स्वसंरक्षणाचा अधिकार मिळावा, इराणनं हमासला शस्त्रं देणं थांबवावं', अमेरिकेचा UNमध्ये ड्राफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2023 11:53 IST

अमेरिकेनं शनिवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावाचा एक मसुदा सादर केला. यामध्ये इस्रायलला स्वसंरक्षणाचा अधिकार असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

अमेरिकेनं शनिवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावाचा एक मसुदा सादर केला. यामध्ये इस्रायलला स्वसंरक्षणाचा अधिकार असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. इराणनं संपूर्ण प्रदेशातील शांतता आणि सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या अतिरेकी आणि दहशतवादी गटांना शस्त्रं पुरवणं थांबवावं, अशी मागणी त्यात करण्यात आली आहे.दहशतवादी हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन केलं जावं आणि गाझा पट्टीत आवश्यक वस्तूंचा पुरवठा अखंड आणि सतत सुरू राहावा, असंही त्यात म्हटलं आहे.

मतदान होणार का?दरम्यान, हा मसुदा मतदानासाठी ठेवण्याची अमेरिकेची योजना आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कोणताही ठराव मंजूर होण्यासाठी, त्याच्या बाजूनं किमान नऊ मतं आवश्यक असतात आणि रशिया, चीन, अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन यांच्याद्वारे व्हिटोचा वापर करण्यात येऊ नये. गाझामधील लाखो लोकांना मदत पोहोचवण्यासाठी मानवतेच्या आधारे विराम देण्याची मागणी करणाऱ्या ब्राझीलनं तयार केलेल्या मसुद्यावर बुधवारी व्हिटो केल्यानंतर अमेरिकेनं हे पाऊल उचललं आहे. गाझामध्ये मदत पोहोचवण्यासाठी मानवतेच्या दृष्टीनं उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली होती.स्वसंरक्षणाचा अधिकारइराणने हमाससह संपूर्ण प्रदेशातील शांतता आणि सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या गटांना शस्त्रं पाठवणं थांबवावं, अशी मागणी मसुदा ठरावात करण्यात आली आहे. या मसुद्याबाबत संयुक्त राष्ट्रातील इराणनं अद्याप कोणतंही उत्तर किंवा प्रतिक्रिया दिलेली नाही. इराण हमासला पाठिंबा देण्याबरोबरच आणखी एक पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना इस्लामिक जिहादलाही आर्थिक मदत आणि शस्त्रं पुरवतो, हे कुणापासून लपून राहिलेले नाही, असंही यात म्हटलंय. ब्राझीलच्या मसुद्यात इस्रायलच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराचा उल्लेख नसल्यामुळे अमेरिका निराश आहे. अमेरिकेच्या मसुद्यात असं म्हटले आहे की संस्थापक यूएन चार्टरच्या कलम ५१ नुसार इस्रायलला असा अधिकार आहे. कलम ५१ मध्ये सशस्त्र हल्ल्यापासून स्वसंरक्षण करण्याचा देशांचा वैयक्तिक किंवा सामूहिक अधिकार समाविष्ट आहे, अशी प्रतिक्रिया अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉमस-ग्रीनफिल्ड यांनी दिली.

टॅग्स :AmericaअमेरिकाIsraelइस्रायलIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष