शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

"100 च्या बदल्यात 275..."; हमासने इस्रायली ओलिसांच्या सुटकेसाठी ठेवली एक अट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2023 10:16 IST

Isreal-Hamas War: हमासने इस्रायलसमोर ओलीस ठेवलेल्या लोकांना सोडण्यासाठी एक अट ठेवली आहे. 

इस्रायल आणि हमास यांच्यात सलग 38 दिवस युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत सुमारे 13,000 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी इस्रायली सैन्य हमासच्या ठिकाणांवर सतत बॉम्बफेक करत आहे, ज्यामुळे 400 हून अधिक ठिकाणं उद्ध्वस्त झाली आहेत. हमासने ओलीस ठेवलेल्या 250 इस्रायली नागरिकांच्या सुटकेसाठी सैन्य सातत्याने दबाव टाकत आहे. याच दरम्यान, हमासने इस्रायलसमोर ओलीस ठेवलेल्या लोकांना सोडण्यासाठी एक अट ठेवली आहे. 

इस्लामिक आंदोलनाच्या सशस्त्र विंगचे प्रवक्ते अबू ओबैदा म्हणाले की, कतारच्या मध्यस्थीमुळे इस्रायली तुरुंगात 200 पॅलेस्टिनी लहान मुलं आणि 75 महिलांच्या बदल्यात 100 इस्रायली ओलीसांची सुटका करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. आम्ही मध्यस्थांना कळवलं की जर आम्ही पाच दिवसांचे युद्धविराम साध्य करू शकलो आणि संपूर्ण गाझा पट्टीतील आमच्या सर्व लोकांपर्यंत मदत पोहोचवू शकलो तर आम्ही त्यांची सुटका करू शकतो. परंतु शत्रू विलंब करत आहे.

रविवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अमेरिकन मीडियाला सांगितलं की, गाझामधील ओलिसांना मुक्त करण्यासाठी एक करार होऊ शकतो, परंतु त्यांनी कोणताही तपशील दिला नाही. इस्रायली अधिकार्‍यांचे म्हणणे आहे की 7 ऑक्टोबर रोजी गाझा पट्टीतील हमासच्या अतिरेक्यांनी इस्रायलच्या मोठ्या लष्करी सीमेवर हल्ला केला तेव्हा परदेशींसह सुमारे 240 लोकांना ओलीस ठेवण्यात आले होते आणि सुमारे 1,200 लोक मारले गेले होते.

हल्ल्यानंतर, इस्रायलने गाझामध्ये बॉम्बफेक सुरू केली, ज्यात हमास सरकारचे म्हणणे आहे की 11,240 लोक मारले गेले, त्यातील बहुतेक हे नागरिक होते. इस्रायलमधील राजकीय नेते आणि लष्करप्रमुखांनी ओलिसांची सुटका होईपर्यंत युद्धविराम होणार नसल्याचं सांगितलं आहे.

टॅग्स :Israel Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsraelइस्रायल