इस्रायलने आपला गुप्तचर उपग्रह 'ओफेक 19' अवकाशात यशस्वीरित्या मंगळवारी रात्री उशिरा प्रक्षेपित केला. हा उपग्रह प्लाननुसार काम करत आहे. त्याच्या मदतीने इस्रायल शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवू शकेल आणि २४ तास प्रत्येक हालचालीची माहिती दिली जाणार आहे.
इस्रायलचा कक्षेत सोडलेला नवीन गुप्तचर उपग्रह हा त्यांच्या शत्रूंना सतत देखरेखीखाली असल्याचा संदेश आहे. काल ओफेक 19 उपग्रहाचे प्रक्षेपण ही एक मोठी जागतिक कामगिरी आहे. फक्त काही देशांकडेच ही क्षमता आहे," असे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
"हे आमच्या सर्व शत्रूंना देखील एक संदेश आहे, ते कुठेही असले तरी, आम्ही तुमच्यावर नेहमीच आणि प्रत्येक परिस्थितीत लक्ष ठेवून आहोत,त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
इराणकडून येणाऱ्या धोक्यांना तोंड देण्यास मदत करेल
इस्रायल आणि इराणमधील १२ दिवसांच्या युद्धानंतर दोन महिन्यांनी हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला आहे. या दरम्यान, इस्रायलने इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पांवर १००० किलोमीटरहून अधिक अंतरावरून हल्ला केला. संरक्षण मंत्रालयाच्या संशोधन आणि विकास संचालनालयाचे प्रमुख डॅनियल गोल्ड यांच्या मते, हल्ल्यांचे मार्गदर्शन करण्यासाठी इराणी भूभागाच्या १२,००० हून अधिक उपग्रह प्रतिमा गोळा करण्यात आल्या.
या मोहिमेने हे अधोरेखित केले आहे की आपल्या प्रदेशात प्रगत निरीक्षण क्षमता असणे हे हवाई आणि जमिनीवरील श्रेष्ठत्व प्राप्त करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे, संरक्षण मंत्रालयासोबत या प्रकल्पावर काम करणाऱ्या सरकारी मालकीच्या इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीजचे सीईओ बोअझ लेव्ही यांनी म्हटले आहे.
इस्रायलकडे अनेक गुप्तचर उपग्रह आहेत. १९८८ मध्ये इस्रायलने आपला पहिला ओफेक उपग्रह तैनात करून अवकाश शक्तींच्या गटात सामील झाला. तेव्हापासून, इस्रायलने असे अनेक उपग्रह प्रक्षेपित केले आहेत, ते त्याला शत्रूच्या क्षेत्रांचे गुप्तचर फोटो देतात. याशिवाय, इस्रायलला अमेरिकन उपग्रहांची देखील मदत मिळते.