शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
5
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
6
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
7
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
8
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
9
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
11
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
12
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
13
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
14
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
15
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
16
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
17
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
18
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
19
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

इस्राईलने केला अल कायदाच्या मोस्ट वाँटेंड दहशतवाद्याचा खात्मा, लादेनची सूनही ठार

By बाळकृष्ण परब | Published: November 14, 2020 4:48 PM

Mosad News : इस्राईलची खतरनाक गुप्तहेर संघटना असलेल्या मोसादने इराणमध्ये जबरदस्त कारवाई करत अल कायदाचा कुख्यात दहशतवादी अबू मोहम्मद मसरी ऊर्फ अब्दुल्ला अहमद अब्दुल्ला याला ठार केले आहे.

ठळक मुद्दे५८ वर्षीय अब्दुल्ला हा इराणमध्ये राहत होताअब्दुल्लावर १९९८ मध्ये आफ्रिकेतील अमेरिकेच्या दोन दूतावासांवर झालेल्या बॉम्ब हल्ल्यातील मास्टर माइंडचे सहकार्य केल्याचा आरोप अब्दुल्ला याला इस्राईलची गुप्तहेर संघटना मोसादच्या गुप्त पथकाने कंठस्नान घातले

तेरहान - इस्राईलची खतरनाक गुप्तहेर संघटना असलेल्या मोसादने इराणमध्ये जबरदस्त कारवाई करत अल कायदाचा कुख्यात दहशतवादी अबू मोहम्मद मसरी ऊर्फ अब्दुल्ला अहमद अब्दुल्ला याला ठार केले आहे. ५८ वर्षीय अब्दुल्ला हा इराणमध्ये राहत होता. अब्दुल्लावर १९९८ मध्ये आफ्रिकेतील अमेरिकेच्या दोन दूतावासांवर झालेल्या बॉम्ब हल्ल्यातील मास्टर माइंडचे सहकार्य केल्याचा आरोप होता.स्फुटनिक या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार अब्दुल्ला याला इस्राईलची गुप्तहेर संघटना मोसादच्या गुप्त पथकाने कंठस्नान घातले. न्यूयॉर्क टाइम्समधील वृत्तानुसार अमेरिकेच्या आदेशावर इस्राइलच्या गुप्त एजंट्सनी इराणमध्ये अब्दुल्ला याला ठार केले. ही कारवाई ७ ऑगस्ट रोजी करण्यात आली होता. या वृत्तानुसार मोसादच्या या कारवाईत अब्दुल्ला याच्यासोबत त्याची मुलगी आणि ओसामा बिन लादेनचा पुत्र हामजा बिन लादेन याची विधवा पत्नीही मारली गेली.मात्रा अब्दुल्ला याला ठार मारण्याच्या मोहिमेत अमेरिकेची काय भूमिका होती, हे स्पष्ट होऊ शकलेले नाहीत. मात्र अमेरिकेची त्याच्यावर दीर्घ काळापासून नजर होती. तसेच अब्दुल्लाचे नाव एफबीआयच्या १७० मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांच्या यादीत सातव्या क्रमांकावर होते. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार अब्दुल्ला हा सन २०१५ पासून तेरहानमधील पसदरान जिल्ह्यात राहत होता.१९ वर्षांपूर्वी ११ सप्टेंबर २००१ रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि पेंटागॉनवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने सन २०११ मध्ये ओसामा बिन लादेनला ठार करण्यात आले होते. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या आदेशानुसार सीआयए, एसएडी आमि एसओजीने केलेल्या संयुक्त कारवाईत ओसामा बिन लादेन ठार झाला होता. तो पाकिस्तानमध्ये लपून बसला होता.

 

 

टॅग्स :Osama Bin Ladenओसामा बिन लादेनterroristदहशतवादीIsraelइस्रायलUnited StatesअमेरिकाIranइराण