Donald Trump, Israel Iran War Ceasefire chances: इस्रायल आणि इराण यांच्यात सध्या भीषण युद्ध सुरु आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांच्या विभागात क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले सुरु आहेत. इराणने केवळ इस्रायलच नव्हे तर आसपासच्या देशांवरही हल्ले केले आहेत. त्यामुळे या युद्धात बरेच देश एकमेकांच्या विरूद्ध उभे ठाकले असल्याचे चित्र आहे. या युद्धाचे पडसाद जगासह भारतावरही उमटू लागले आहेत. कच्च्या तेलाचा पुरवठा कमी झाला असून, गॅसच्या किमतीत वाढ झाली आहे. हे युद्ध कधी थांबणार, असा प्रश्न सर्व जगाला पडला आहे. याचा उत्तराबाबत कदाचित अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या 'ट्रुथ सोशल' (Truth Social) या प्लॅटफॉर्मवरून संकेत दिले आहेत.
ट्रम्प यांच्या पोस्टमागचे गणित
'इराणने विनाअट शरणागती (Unconditional Surrender) पत्करल्याशिवाय कोणताही करार होणार नाही' अशी पोस्ट ट्रम्प यांनी ६ मार्चला केली आहे. या एका विधानामुळे आता या भीषण युद्धाच्या समाप्तीचे संकेत मिळत असल्याचे मानले जात आहे. यामागे जुना पॅटर्न आहे असे म्हटले जात आहे. १७ जून २०२५ रोजी जेव्हा इराण-इस्रायलमध्ये १२ दिवसांचे युद्ध सुरू होते, तेव्हाही ट्रम्प यांनी "विनाअट शरणागती" अशीच मागणी केली होती. त्या पोस्टच्या बरोबर ६ दिवसांनंतर, म्हणजेच २३ जून रोजी युद्धबंदीची (Ceasefire) घोषणा झाली होती.
१२ मार्चची तारीख
जर हाच '६ दिवसांचा पॅटर्न' पुन्हा लागू झाला, तर ६ मार्च रोजी केलेल्या या नव्या पोस्टनंतर १२ मार्च २०२६ पर्यंत युद्धविराम घोषित होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, इराणने शरणागती पत्करल्यानंतर आणि एका नवीन योग्य नेत्याची निवड झाल्यानंतर, अमेरिका इराणची अर्थव्यवस्था पूर्वीपेक्षा अधिक मजबूत करण्यासाठी काम करेल. त्यांनी 'Make Iran Great Again' (MIGA!) असा नाराही दिला आहे.
सध्याची युद्धपरिस्थिती फाचट बिकट
मागच्या वेळच्या तुलनेत यावेळी युद्धपरिस्थिती अधिक गंभीर आहे. हे युद्ध डझनभर देशांमध्ये पसरले असून यामध्ये अनेक अमेरिकन सैनिकांचाही मृत्यू झाला आहे. सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये बदला घेण्याची भावना तीव्र आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियन यांनी तूर्तास नरमाईची भूमिका घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता काय घडणार, याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे.
Web Summary : Trump's post about Iran's unconditional surrender hints at a ceasefire. Comparing it to a past event, speculation suggests a potential ceasefire by March 12, 2026. The current war is severe, involving many nations, and Iran's stance remains firm.
Web Summary : ईरान के बिना शर्त आत्मसमर्पण पर ट्रम्प के पोस्ट ने युद्धविराम का संकेत दिया। पिछली घटना की तुलना से 12 मार्च, 2026 तक संभावित युद्धविराम का अनुमान है। वर्तमान युद्ध गंभीर है, जिसमें कई राष्ट्र शामिल हैं, और ईरान का रुख दृढ़ है।