शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 16:57 IST

इराणच्या उत्तर-पश्चिमेकडील तबरीज शहरात मंगळवारी दोन जबरदस्त स्फोट झाले... महत्वाचे म्हणजे, तबरीज येथे इराणचे एक मुख्य हवाई तळही आहे...

इराण आणि इस्रायल यांतील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. यातच, इराणचे सर्वोच्च नेता आयतुल्ला अली खामेनेई यांनी एक धार्मिक मेसेजच्या माध्यमाने इस्रायलला थेट इशारा दिला आहे. त्यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर (X) पवित्र कुरानची एक आयत पोस्ट केली आहे. "अल्लाहची मदत आणि लवकरच येणारा विजय"(कुरान 61:13). अल्लाहच्या इच्छेने इस्लामिक राष्ट्र, यहूदी राजवटीवर (Zionist regime) विजय मिळवेल."

खामेनेई यांच्या या मेसेजकडे, इस्रायलला थेट इशारा म्हणून बघितले जात आहे. महत्वाचे म्हणजे, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला असतानाच खामेनेई यांनी ही पोस्ट केली आहे.

इराणच्या तबरीज शहरात दोन मोठे स्फोट - इराणच्या उत्तर-पश्चिमेकडील तबरीज शहरात मंगळवारी दोन जबरदस्त स्फोट झाले. हम मिहन वृत्त पत्राने दिलेल्या वृत्तानुसार, हे दोन्ही स्फोट पाच मिनिटांच्या अंतराने झाले. इराणी वृत्तसंस्था मेहरने याची पुष्टी करत स्फोटानंतर शहरात धुराचे लट दिसत होते. याशिवाय या स्फोटांचे व्हडिओ फुटेजही समोर आले आहे. महत्वाचे म्हणजे, तबरीज येथे इराणचे एक मुख्य हवाई तळही आहे. 

जेरुसलेम आणि तेल अवीवमध्ये मोठे स्फोट -जेरुसलेम आणि तेल अवीव या दोन्ही शहरांत मंगळवारी सकाळच्या सुमारास मोठे स्फोट झाल्याचे वृत्त आहे. इराणने डागलेल्या मिसाइल्सच्या इशाऱ्यानंतर, संपूर्ण इस्रायलमध्ये एअर रेड सायरन वाजवण्यात आला आणि नागरिकांना बॉम्ब शेल्टरमध्ये जाण्याचे निर्देश देण्यात आले. यासंदर्भात इस्रायली लष्कराने एक निवेदन जारी करत, इराणने इस्रायलकडे मिसाइल डागल्यानंतर, अनेक भागांत सायरन वाजवण्यात आले आहेत. तसेच, आपण मिसाइल्स इंटरसेप्ट करण्यासाठी आणि आवश्यक ठिकानी हल्ला करण्यासाठी सक्रियपणे कारवाई करत आहोत, असेही  IDF ने म्हटले आहे.

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलwarयुद्ध