शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
2
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
3
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
4
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
5
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
6
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
7
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
8
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
9
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
10
सामुद्रिक शास्त्र: शरीराच्या कुठल्या भागावर 'तिळ' आहे, त्यानुसार समुद्र शास्त्र सांगते तुमचे भाकीत!
11
​​​​​​​Kotak Mahindra Bank Success Story: २ खोल्यांपासून झाली सुरुवात, आज ४ लाख कोटींचा टर्नओव्हर; वाचा कोटक महिंद्रा बँकेची अनटोल्ड स्टोरी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, राफेलचीही बदनामी केली; अहवालात खुलासा
13
VIDEO : तिकडं स्टार्कचा अप्रतिम फ्लाइंग कॅच; इकडं नेटकऱ्यांनी KL राहुलची उडवली खिल्ली; कारण...
14
Astro Tips: कुंडलीतील गुरुचे स्थान निश्चित करते, तुम्हाला संसार सुख मिळणार की वैराग्य!
15
भयंकर! चालत्या कारला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी लोकांनी मारल्या उड्या
16
सॅलरी कमी होणार, PF-ग्रॅच्युईटीमध्ये वाढ होणार? नोकरी करणाऱ्या लोकांसाठी अनेक गोष्टी बदलणार
17
जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये तडजोडी, आयात उमेदवार अन् फोडाफोडी; अजितदादांच्या ‘ताकदीच्या मर्यादा’ उघड
18
Video - "मी तुम्हाला आणि तुमच्या मुलीला मारून टाकेन"; प्रिन्सिपलची जीवे मारण्याची धमकी
19
‘या’ सरकारी बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या शर्यतीत दिग्गज बँक; अनेक दिवसांपासून सुरू आहे खासगीकरणाचा विचार
20
Smriti Mandhana Haldi Ceremony : टीम इंडियाच्या 'राणी'च्या हळदी समारंभात संघातील साऱ्याजणींचा झिंगाट डान्स
Daily Top 2Weekly Top 5

इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 19:44 IST

Israel - Iran War: इराणचे प्रमुख खामेनेईंचे सर्व लष्करी सल्लागार मारले गेले आहेत, प्रत्युत्तरात इराणने इस्रायलच्या मोसादच्या मुख्यालयावर हल्ला केला आहे. यावर आता इराणने मोठी धमकी दिली आहे. 

इराण आणि इस्रायलयुद्ध आता आणखी भयानक होत जाणार आहे. अमेरिकेत मोठ्या हालचाली सुरु आहेत. इस्रायल अद्याप इराणच्या अण्वस्त्रांच्या उपकरणांच्या साठ्याला धक्काही लावू शकलेला नाही. कारण ती जमिनीखाली भुयारांमध्ये ठेवण्यात आलेली आहेत. या भूमिगत कोठारांना केवळ अमेरिकेचाच बॉम्ब आणि तो वाहून नेण्याची ताकद असलेले बॉम्बर विमान लागणार आहे. अशातच गुरुवारी किंवा शुक्रवारी हा हल्ला होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. इराणचे प्रमुख खामेनेईंचे सर्व लष्करी सल्लागार मारले गेले आहेत, प्रत्युत्तरात इराणने इस्रायलच्या मोसादच्या मुख्यालयावर हल्ला केला आहे. यावर आता इराणने मोठी धमकी दिली आहे. 

इराणकडे जवळपास २० हजार मिसाईल आहेत.जरी आम्ही दिवसाला २०० मिसाईल डागली तरी आम्ही पुढील १०० दिवस सलग ती डागू शकतो. इस्रायल आणि अमेरिकेकडे एवढी मोठी डिफेंस सिस्टीम नाहीय की ही मिसाईल ते रोखू शकतील, असा इशारा इराणचे डिप्लोमॅटिक हाऊसचे संचालक हमीद रेझा गोलमजादेह यांनी दिला आहे. दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही धमकी दिली आहे. 

जर या लोकांना इराणविरोधात लढण्याची इच्छा असेल तर त्यांनी त्याची किंमत मोजण्यासाठी तयार रहावे, असेही ते म्हणाले आहेत. इराण अजूनही उघड युद्ध लढू इच्छित नाही. इस्रायल आतून कमकुवत झाला आहे तो कधीही कोसळू शकतो. मुस्लिम देशांना फार काही करण्याची गरज असल्याचे मला वाटत नाही. इतक्या लवकर इराण प्रत्युत्तर देईल अशी अपेक्षा इस्रायलला नव्हती. आपले सैन्य पुन्हा तयार करण्यासाठी इराणला ३-४ आठवडे लागतील असे त्यांना वाटले होते. परंतू आम्ही पुढच्या १२ तासांतच स्वत:ला तयार केले आणि इस्रायलवर हल्ले चढविले, असेही गोलमजादेह म्हणाले. 

आम्ही दोन इस्रायली लढाऊ विमाने पाडली आहेत. एक पायलट आमच्या ताब्यात आहे. कारमधून इस्रायलने ड्रोन आणले आणि आमची एअर डिफेन्स सिस्टीम उडविली. आता कमी प्रमाणावर इस्रायली ड्रोन येत आहेत, असा दावा त्यांनी केला. अमेरिकेने येमेनसोबत युद्धबंदीवर स्वाक्षरी केली. हे स्पष्ट आहे की अमेरिका येमेनमधील हुथींना काहीही करू शकत नाही. आमचे युद्ध इस्रायलविरोधात आहे, जर ते मध्ये आले तर त्यांनाही भोगावे लागेल, अशी धमकी गोलमजादेह यांनी दिली आहे. 

टॅग्स :Israelइस्रायलIranइराणAmericaअमेरिकाwarयुद्ध