शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 19:24 IST

अमेरिकेने एक विमानवाहू युद्धनौका देखील मध्य पूर्वेकडे पाठविली आहे. या युद्धनौकेवर लढाऊ विमाने आहेत.

इराण आणि इस्रायलमधील सुरु झालेला संघर्ष आता युद्धाकडे वळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इस्रायलनेइराणच्या आकाशावर ताबा मिळविल्याचा दावा केला आहे. तर इराणची मिसाईल इस्रायलवर आघात करत आहेत. अशातच अमेरिकेची हवेतच लढाऊ विमानांना इंधन देणारी २८ टँकर विमाने एकाचवेळी आखाती देशांकडे झेपावल्याने जगाची झोप उडाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही इंधन असणारी टँकर विमाने इस्रायल-इराणच्या दिशेने पाठविण्याचे कारण काय असा सवाल उपस्थित होत आहे. 

अमेरिकेने एक विमानवाहू युद्धनौका देखील मध्य पूर्वेकडे पाठविली आहे. या युद्धनौकेवर लढाऊ विमाने आहेत. परंतू, केसी १३५ आणि के सी ४६ ए या टँकरसोबत लढाऊ विमाने पाठविली की नाहीत हे मात्र समजू शकलेले नाहीय. फ्लाईट ट्रॅकिंग सॉफ्टवेअरने ही विमाने अटलांटिक महासागरावरून पूर्वेकडे जात असल्याचे दिसत आहे. हे दृष्य भयावह असले तरी इराणची मात्र भितीने गाळण उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

या विमानांसोबत लढाऊ विमाने देखील असण्याची शक्यता आहे. कारण ही लढाऊ विमाने जेव्हा मिशनवर असतात तेव्हा ट्रान्सपोंडर बंद करून ठेवतात. यामुळे साध्या फ्लाईट ट्रॅकिंग सॉफ्टवेअरवर ती दिसत नाहीत. २८ लष्करी हवाई इंधन भरणाऱ्या टँकरची एकत्रित हालचाल असामान्य मानली जात आहे. सोमवारची रात्र इराणसाठी काळरात्र ठरण्याची शक्यता आहे. एवढ्या मोठ्या संख्येने हवाई इंधन भरणारे टँकर तैनात करण्याचे नेमके कारण कोणालाच समजू शकलेले नाही. 

फ्लाइट ट्रॅकिंग सॉफ्टवेअरवर सर्व टँकर दिसल्यानंतर सोशल मीडियावरही खळबळ उडाली आहे. रिफ्युएलर पूर्वेकडे, युरोप, मध्य पूर्व आणि आशियाकडे एकाच वेळी जाताना दिसत आहेत. नॉर्वेमध्ये बहुराष्ट्रीय सराव सुरू होणार असला तरी एवढ्या मोठ्या प्रमाणावर या टँकर विमानांची गरज नाही. अमेरिका कदाचित इस्रायलच्या मदतीला ही विमाने पाठवत असल्याची चर्चाही सुरु झाली आहे. असे झाले तर अमेरिका इराणविरोधातील युद्धात उडी घेण्याची शक्यता आहे. इराणने नुकताच इस्रायलमधील अमेरिकेच्या दुतावासावरही हल्ला केला होता. 

टॅग्स :AmericaअमेरिकाIranइराणIsraelइस्रायलwarयुद्ध