शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
2
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
3
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
4
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
5
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
6
शरणू हांडेचं अपहरण करणारा 'तो' युवक आणि मास्टरमाईंड कोण?; गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक आरोप
7
Kapil Sharma : "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी
8
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
9
Duleep Trophy 2025 : ज्युनिअरच्या नेतृत्वाखाली कर्तृत्व दाखवण्यासाठी मैदानात उतरणार हे २ सिनियर्स
10
सारखा भाऊच का? रक्षाबंधनाला बहिणीने ओवाळणी द्यायची की भावाने? भाऊबीजेचे काय, वाचा यमाची कथा...
11
थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव
12
Video - 'ते' आले अन् धारदार शस्त्रांनी केला हल्ला; हुमा कुरेशीच्या भावाच्या हत्येचे CCTV फुटेज
13
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
14
पालकमंत्रिपदाचा तिढा सुटेना; आता ध्वजवंदनावरून वादंग; १५ ऑगस्टचा मान गोगावलेंना देण्याची मागणी
15
पाक क्रिकेटर बलात्कार प्रकरणात अडकला; पोलिसांनी मॅच सुरु असतानाच ठोकल्या बेड्या
16
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
17
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
18
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
19
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
20
तिसरा श्रावण शनिवार: तुमची साडेसाती सुरू आहे? अश्वत्थ मारुती पूजनासह ‘हे’ ५ शनि उपाय कराच!

'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 20:29 IST

Israel-Iran War: इराण आणि इस्रायल मित्रराष्ट्र असल्यामुळे भारताने युद्धाबाबत तटस्थ भूमिका घेतली आहे.

Israel-Iran War: इस्रायल आणि इराणमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. दोन्ही देश सातत्याने एकमेकांवर हल्ले करत आहेत. या युद्धामुळे दोन गट पडले असून, अमेरिका इस्रायलच्या बाजूने आहे, तर रशिया, चीनसारखे देश इराणला पाठिंबा देत आहेत. या युद्धात भारताची भूमिकाही खूप महत्वाची आहे. भारताने नेहमीप्रमाणेच तटस्थ भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर, आता इराणने भारताकडे इस्रायलवर दबाव टाकण्याची विनंती केली आहे.

इराणचे भारतातील उपराजदूत मोहम्मद जावेद हुसैनी यांनी भारताला इस्रायलचा उघडपणे निषेध करण्याचे आणि नेतन्याहू सरकारवर दबाव टाकण्याची विनंती केली आहे. ते म्हणाले की, भारतासारख्या मोठ्या आणि शांतताप्रेमी देशांनी इस्रायलवर टीका करुन, त्यांच्यावर दबाव टाकण्यात आघाडीची भूमिका बजावली पाहिजे. आम्हाला भविष्यात भारताकडून चांगल्या सहकार्याची अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच, ऑक्टोबरमध्ये इस्रायलने हमासवर हल्ला केला, तेव्हाच जर इस्रायलचा जागतिक स्तरावर निषेध झाला असता, तर त्यांनी इराणवर हल्ला करण्याचे धाडस कधीच केले नसते, असेही ते म्हणाले.

इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

IAEA च्या भूमिकेवर प्रश्नमोहम्मद जावेद हुसैनी यांनी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या (IAEA) निष्पक्षतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि म्हटले की, IAEA ने स्वतः म्हटले होते की, इराणच्या बाजूने कोणतीही लष्करी अणुक्रिया चालू नाही. तरीही त्यांनी इस्रायलची बाजू घेऊन इराणविरुद्ध लष्करी कारवाईचे समर्थन केले. यामुळे IAEA च्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

आम्हाला अणुशस्त्रांची गरज नाहीहुसैनी यांनी स्पष्टपणे सांगितले की, इराणच्या संरक्षण धोरणात अणुशस्त्रांना स्थान नाही, आम्हाला सुरक्षेसाठी त्यांची गरज नाही. अण्वस्त्रे आमच्या संरक्षण धोरणाचा भाग नाहीत. आम्ही अण्वस्त्रांशिवाय स्वतःचे रक्षण करू शकतो. इराण शस्त्रांसाठी युरेनियम काढत आहे, असे जे आरोप केले जात आहेत, ते पूर्णपणे खोटे आहेत. हे आरोप प्रत्यक्षात दुसरा अजेंडा साध्य करण्याचा प्रयत्न आहेत. हे लोक उघडपणे सत्ताबदलाबद्दल बोलतात. यातूनच त्यांचा खरा हेतू स्पष्ट होतो, असेही त्यांनी यावेळी म्हटले.

पाकिस्तानबद्दल म्हणाले...पाकिस्तानी लष्करप्रमुखांच्या अमेरिका दौऱ्यानंतर अमेरिका पाकिस्तानच्या भूमीचा वापर करेल का? या प्रश्नावर हुसैनी यांनी आशा व्यक्त केली की, पाकिस्तान अशा कोणत्याही हालचालीत सहभागी होणार नाही आणि इस्रायली हल्ल्यांविरुद्ध इराणला पाठिंबा देईल. यावेळी त्यांनी अमेरिकेला स्पष्ट शब्दात इशाराही दिला की, या संघर्षात तिसऱ्या पक्षाने हस्तक्षेप केला, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. 

'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प