शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 11:13 IST

Israel Iran Death Count: इस्रायल इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षात शेकडो लोकांचे बळी गेले आहेत. जखमींची संख्याही प्रचंड वाढली आहे.

Israel Iran Killed: इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे. दोन्ही देशांचे एकमेकांवर हवाई हल्ले सुरूच आहेत. या संघर्षात इराणमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून, जखमींची संख्याही प्रचंड वाढली आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मानवी हक्क समूहाने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत इराणमध्ये ६३९ लोकांचा मृत्यू झाला आहे. जखमींची संख्या १३२९ वर पोहोचली आहे. 

वाचा >>इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!

वॉशिंग्टन येथील मानवी हक्क समूहाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. मृतांपैकी ज्यांची ओळख पटली आहे, त्यात २६३ नागरिक आहेत. १५४ लष्कराचे जवान आहेत. इराणकडून मात्र मृतांची आकडेवारी देण्यात आली नाही. मृतांच्या आकड्याबद्दल शेवटची माहिती सोमवारी देण्यात आली होती. २२४ नागरिकांचा मृत्यू झाला असून, १२७७ जखमी झाले असल्याचे इराणने म्हटले होते. 

इराणमधील न्यूज चॅनेल्स केले हॅक

इस्रायलमधील हॅकर्संनी बुधवारी रात्री उशिरा इराणची सरकारी वृत्तवाहिनी (जशी भारतात डीडी न्यूज, दूरदर्शन आहे.) आयआरआयबी टीव्हीसह इतर काही न्यूज चॅनेल्स हॅक करण्यात आले. न्यूज चॅनेल्स हॅक करून इराणमधील बंडखोरांना आवाहन केले गेले. 

हॅक करण्यात आलेल्या न्यूज चॅनेल्सवर इराणमध्ये २०२२ मध्ये झालेल्या जनआंदोलनाचे व्हिडीओ प्रसारित करण्यात आले. या व्हिडीओमध्ये इराणी महिला स्वतःचे केस कापतानाचेही व्हिडीओ होते. 

इराण शरणागती पत्करणार नाही -खामेनी 

इस्रायल-इराण संघर्षादरम्यान अमेरिकेने इराणने शरणागती पत्करावी असे म्हटले होते. अमेरिकेचा हा प्रस्ताव इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनी यांनी फेटाळून लावला. इराण शरणागती पत्करणार नाही, असे खामेनी म्हणाले. 

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलAmericaअमेरिकाwarयुद्ध