शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

Israel Iran Conflict : इस्त्रायली हल्ल्यात इराणमध्ये दोन भारतीय विद्यार्थी जखमी; भारताने परत आणण्याची तयारी केली, या मार्गाने आणले जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 14:04 IST

Israel Iran Conflict : इराण आणि इस्त्रायलमध्ये मागील काही दिवसांपासून तणाव सुरू आहे.

Israel Iran Conflict : मागील काही दिवसांपासून इराण आणि इस्त्रायलमध्ये तणाव सुरू आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले केले आहेत, या दोन्ही देशातील तणावामुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे. 

या युद्धात आता सामान्य लोकही सापडले आहेत. याचा परदेशी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवरही परिणाम होत आहे. काल रात्री तेहरान युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेसच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या मुलांच्या वसतिगृहाजवळ हल्ला झाला. या हल्ल्यात दोन भारतीय विद्यार्थी जखमी झाले. हे दोन्ही विद्यार्थी जम्मू आणि काश्मीरचे आहेत. 

एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले

दोन्ही विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर आहे आणि विद्यापीठ प्रशासनाने त्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन त्यांना रामसर येथे हलवले आहे. या घटनेमुळे इराणमध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता निर्माण झाली आहे. स्थानिक प्रशासन आणि भारतीय दूतावास या प्रकरणाची चौकशी करत आहेत. विद्यार्थ्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी इराणसोबत चर्चा करत आहेत. 

इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकार एक मोहीम सुरू करणार आहे. 'भारतीयांसह परदेशी नागरिकांना त्यांच्या देशात सुरक्षितपणे पाठवले जाईल', असं इराण सरकारने म्हटले आहे.

इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना अझरबैजान, तुर्कमेनिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवरून बाहेर काढले जाईल.

इराणने थेट अमेरिकन दूतावासावर डागली मिसाइल्स

 इस्रायलमधील तेल अवीव येथील अमेरिकन दूतावासावर इराणने क्षेपणास्त्राच्या सहाय्याने हल्ला केला आहे. दूतावासावरील या हल्ल्यात इमारतीचा एक भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. मात्र सुदैवाने कोणत्याही जीवितहानीते वृत्त नाही. अमेरिका सरकार इस्रायल आणि इराण यांच्यात शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्न करत आहे. त्याच वेळी अशा प्रकारचा हल्ला झाल्याने यातून अनेक अर्थ काढले जात आहेत.

दूतावास दिवसभरासाठी बंद

वृत्तसंस्था असोसिएटेड प्रेसच्या वृत्तानुसार, इराण इस्रायलवर सतत क्षेपणास्त्र हल्ले करत आहे. त्यातच आता इराणी क्षेपणास्त्राने अमेरिकन दूतावासावर हल्ला केला. अमेरिकेचे राजदूत माइक हकाबी यांच्या मते, या हल्ल्यात अमेरिकन वाणिज्य दूतावासाच्या इमारतीच्या काही भागाचे नुकसान झाले आहे. परंतु, कोणीही जखमी किंवा मृत्युमुखी पडलेले नाही. खबरदारी म्हणून तेल अवीवमधील वाणिज्य दूतावास आणि जेरुसलेममधील दूतावास संपूर्ण दिवसासाठी बंद ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :Israelइस्रायलIranइराणIndiaभारत