शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
2
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
3
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
4
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
5
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
6
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी
7
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
8
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
9
अमूल, पार्ले-जी, गोदरेज... अमेरिकेच्या टॅक्सपासून वाचण्यासाठी भारतीय कंपन्यांचा 'जुगाड', उचलू शकतात 'हे' पाऊल
10
"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
11
बलात्काराची खोटी तक्रार; माजी महिला बँक कर्मचाऱ्याला अटक
12
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
13
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
15
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
16
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
17
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
18
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
19
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
20
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...

इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 14:04 IST

Israel Iran Ceasefire: इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान, जगातील एक शक्तिशाली लष्करी ताकद म्हणून मिरवणाऱ्या इस्राइलच्या संरक्षण व्यवस्थेच्या अनेक मर्यादा उघड झाल्या. इराणविरुद्धच्या संघर्षातून इस्राइलला नेमके कोणते धडे मिळाले आहेत. याचा घेतलेला हा आढावा.

इस्राइल आणि इराणदरम्यान गेल्या १२ दिवसांपासून सुरू असलेलं युद्ध अखेर आज थांबलं. १३ जून रोजी इराणमधील अणुकेंद्र उद्ध्वस्त करण्यासाठी इस्राइलने सुरू केलेल्या ऑपरेशन रायझिंग लायनला इराणकडूनही तितकंच विध्वंसक प्रत्युत्तर मिळालं. त्यामुळे इस्राइलमध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. या युद्धादरम्यान, जगातील एक शक्तिशाली लष्करी ताकद म्हणून मिरवणाऱ्या इस्राइलच्या संरक्षण व्यवस्थेच्या अनेक मर्यादा उघड झाल्या. इराणविरुद्धच्या संघर्षातून इस्राइलला नेमके कोणते धडे मिळाले आहेत. याचा घेतलेला हा आढावा.

इस्राइलच्या आयरन डोमच्या मर्यादा उघड इस्राइलच्या दिशेने येणारी क्षेपणास्रे आणि इतर हल्ल्यांना रोखण्यासाठी इस्राइलकडून आयरन डोमच्या माध्यमातून रोखली जातात. ही सुरक्षा यंत्रणा छोटी आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्रे, तसेच ड्रोनना रोखण्यासाठी सक्षम आहे. या युद्धातही इराणने डागलेली ४५० क्षेपणास्त्रे आणि १००० ड्रोनपैकी ९० टक्के हल्ल्यांना आयरन डोमने रोखले. मात्र इराणने डागलेल्या हाज कासेम, खैबर शेकन क्षेपणास्त्रांनी आयरन डोमला हुकलावणी देत लक्ष्यभेद केला, अशी माहिती इन्स्टिट्युट फॉर स्टडी ऑफ वॉरने दिली आहे. आयरन डोमबाबत तज्ज्ञांनी एक्सवर लिहिले की, आयरन डोम जबरदस्त सुरक्षा प्रणाली आहे. मात्र ती एकाच वेळी शेकडो क्षेपणास्त्रांना रोखू शकत नाही. आयरन डोमच्या बॅटरींची संख्या आणि इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांचा पुरवठा मर्यादित असल्याचे या युद्धातून  दिसून आले. आता इस्राइलला एरो-२, एरो-३ आणि डेव्हिड्स स्लिंगसारख्या प्रमाली भक्कम कराव्या लागतील. तसेच लेझर आधारित प्रमाणींचा वापर वाढवावा लागेल.

नागरिकांचं संरक्षण आणि अपुरे बंकर सतत कुठल्या ना कुठल्या शत्रूकडून हल्ल्याची शक्यता नेहमीच असल्याने इस्राइलमध्ये नागरिकांच्या रक्षणासाठी बंकरची व्यवस्था आहे. हल्ल्याच्या शक्यतेचे बिगुल वाजल्यानंतर येथील नागरिक बंकरमध्ये आश्रय घेतात. दरम्यान, इराणने केलेल्या हल्ल्यांमध्ये इस्राइलचे २४ नागरिक मृत्युमुखी पडल्याची तर ६०० हून अधिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यातील अनेक जण बचावासाठी बंकरकडे पळत असताना हल्ल्यात सापडल्याचे समोर येत आहे. त्यामुळे येत्या काळात इस्राइलला हल्ल्यांपासून रक्षण करण्यासाठी अत्याधुनिक बंकर आणि हल्ल्यांचे संकेत देणारी इशारा प्रणाली उभी करावी लागणार आहे.

गुप्तचर यंत्रणेतील त्रुटीइराणबरोबरच्या युद्धात इस्राइलची गुप्तचर यंत्रणा मोसाद आणि लष्करी गुप्तचर विभाग ८२०० ने प्रभावी भूमिका बजावली. अटलांटिक कौन्सिलच्या रिपोर्टनुसार मोसादने इराणमध्ये ड्रोन आणि शस्रास्त्रे तैनात केली होती. इस्राइलच्या गुप्तचर यंत्रणांनी अचूक हल्ले करून आयआरजीसीचे २१ कमांडर आणि १० संशोधकांना लक्ष्य केलं. तसेच गुप्तचर यंत्रणांच्या माहितीच्या आधारावर अणुकेंद्रांना लक्ष्य केलं. मात्र इस्राइलला मिळालेल्या गोपनीय माहितीमध्ये काही त्रुटी होत्या. त्यामुळे इराणला त्यांची क्षेपणास्त्रे गोपनीय ठिकाणी हलवता आली. इस्राइलच्या गुप्तचर यंत्रणांना इराणच्या क्षेपणास्त्रांच्या तैनातीवर पूर्ण लक्ष देता आलं नाही.  त्यामुळे इस्राइलला भविष्यात सर्वप्रकारच्या गुप्तचर यंत्रणांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा कराव्या लागतील.

मित्रराष्ट्रांचा पाठिंबाया हल्ल्यादरम्यान, इस्राइलला जी७ देशांचा पाठिंबा मिळाला. तसेच अमेरिकाही इस्राइलच्या मदतीला आली. जॉर्डन आणि सौदी अरेबियाने आपली हवाई हद्द वापरायला दिली. मात्र तुर्की आणि कतारसारख्या देशांनी इस्राइलच्या कारवाईला विरोध केला. त्यामुळे या कारवाईदरम्यान दोन गट निर्माण झाले. पुढच्या काळात इस्राइलला प्रादेशिक पातळीवर मित्रपक्षांची संख्या वाढवावी लागेल. तसेच संरक्षणासाठी अमेरिकेवर अवलंबून राहणे कमी करावे लागेल, असेही दिसून आले.

अर्थव्यवस्थेवरील परिणाम इराणसोबतच्या संघर्षामुळे इस्राइलला मोठा आर्थिक फटका बसला आहे. एका अंदाजानुसार इस्राइलचं सुमारे १२ बिलियन डॉलर एवढ्या रकमेचं नुकसान झालं.  हैफा येथील तेल रिफायनरी बंद झाली. तेल अवीव आणि इतर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात मालमत्तेचं नुकसान झालं. या नुकसानीतून सावरण्यासाठी इस्राइलला बरीच वर्षे लागणार आहेत.  

टॅग्स :Israelइस्रायलIranइराणInternationalआंतरराष्ट्रीय