शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
7
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
10
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
11
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
12
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
13
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
14
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
15
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
16
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
17
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
18
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
19
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

लेबनॉनची अवस्था गाझासारखी करू; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 21:23 IST

इस्रायल आणि हिजबुल्लाहमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे.

Israel Hezbollah Conflict: इस्रायल आणि लेबनॉनमधील दहशतवादी संघटना हिजबुल्लामधील संघर्ष दिवसेंदिवस भीषण होत चालला आहे. दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मंगळवारी (08 ऑक्टोबर) एका व्हिडिओ संदेशाद्वारे लेबनॉनला कडक शब्दात इशारा दिला. 'हिजबुल्लाहला तुमच्या देशात काम करू दिले, तर तुमच्या देशाची परिस्थिती गाझासारखी होऊ शकते,' असं नेतन्याहू म्हणाले.

पंतप्रधान बेंजामिन यांचे हे विधान अशावेळी आले आहे, जेव्हा इस्रायली सैन्याने लेबनॉनच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवर हिजबुल्लाहच्या विरोधात आपले आक्रमण तीव्र केले आहे. या भागात इस्रायलने आपले अतिरिक्त सैन्य तैनात केले असून, येथे राहणाऱ्या नागरिकांना हा परिसर रिकामा करण्याचा सल्ला दिला आहे.

बेंजामिन नेतन्याहू यांचे आव्हान!लेबनीज लोकांना उद्देशून नेतान्याहू यांनी पुढील विनाश टाळण्यासाठी त्यांच्या देशाला हिजबुल्लाच्या तावडीतून मुक्त करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, 'लेबनॉनला भीषण युद्धात पडण्यापूर्वी वाचवण्याची संधी तुमच्याकडे आहे. हिजबुल्लाहला आपल्या देशात कारवाया करण्यापासून रोखा, अन्यथा गाझासारखा तुमचाही विनाश अटळ आहे. लेबनॉनमधील नागरिकांनी आपला देश हिजबुल्लाहपासून मुक्त करावा आणि हे युद्ध थांबवावे,' असेही नेतान्याहू म्हणाले.

संघर्ष कधी वाढला?गेल्यावर्षी 7 ऑक्टोबर 2023 पासून हा संघर्ष सुरू आहे. हमासने इस्रायलवर भयंकर हल्ला केला होता, ज्यामध्ये एक हजाराहून अधिक नागरिक मारले गेले. तेव्हापासून हमासचा समर्थक गट हिजबुल्लाहदेखील या युद्धात उतरला आणि इस्रायलवर हल्ले सुरू केले. यानंतर इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील संघर्ष वाढला. सध्या इस्रायल हिजबुल्लाह आणि हमास, अशा दोन दहशतवादी संघटनांशी सामना करत आहे.

टॅग्स :Israelइस्रायलIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षwarयुद्धIranइराणInternationalआंतरराष्ट्रीय