भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 19:50 IST2025-07-16T19:48:06+5:302025-07-16T19:50:48+5:30
Israel Syria War Airstrike : हल्ल्याच्या भीतीने मंत्रालयाचे अधिकारी तळघरात लपून बसले

भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
Israel Syria War : मध्य पूर्वेतील अनेक आघाड्यांवर युद्ध सुरू आहे. त्यातील जवळजवळ प्रत्येक युद्धात इस्रायलचा सहभाग दिसून येत आहे. यातील ताजी अपडेट अशी आहे की इस्रायलनेसीरियावरील हल्ले तीव्र केले आहेत. इस्रायली सैन्य आयडीएफ (इस्रायली संरक्षण दल) ने बुधवारी सीरियाची राजधानी दमास्कसमधील सीरियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर हल्ला केला. सोमवारपासून इस्रायल सीरियाच्या इस्लामिक नेतृत्वाखालील सरकारच्या सैन्याला लक्ष्य करत आहे. दक्षिण सीरियाच्या स्वैदा शहरात स्थानिक सुरक्षा दल आणि ड्रुझ समुदायाच्या लढाऊंमध्ये झालेल्या चकमकीनंतर इस्रायलने सीरियाच्या सैन्याला लक्ष्य करण्यास सुरुवात केली.
स्थानिक सैनिकांच्या हल्ल्यांपासून ड्रुझ अल्पसंख्याकांचे रक्षण करण्यासाठी ते हे हल्ले करत असल्याचे इस्रायलचे म्हणणे आहे. सीरियाच्या संरक्षण मंत्रालयातील सुरक्षा सूत्रांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेला सांगितले की मंत्रालयाच्या इमारतीवर किमान दोन ड्रोन हल्ले झाले आहेत आणि अधिकारी तळघरात लपून बसले आहेत. सीरियाच्या सरकारी वृत्तवाहिनी इलेखबारिया टीव्हीने वृत्त दिले आहे की इस्रायली हल्ल्यात दोन नागरिक जखमी झाले आहेत.
⚡️🇸🇾🇮🇱BREAKING:
— Suppressed News. (@SuppressedNws) July 16, 2025
Israel has bombed the Syria’s Ministry of Defense headquarters in Damascus, launching multiple airstrikes.
Three of the strikes also targeted areas near the presidential palace in the capital. pic.twitter.com/wbpbq8OAiX
इस्रायली सैन्याने म्हटले आहे की, 'आम्ही दमास्कसमधील सीरियन राजवटीच्या लष्करी मुख्यालय संकुलाच्या प्रवेशद्वारावर हल्ला केला आहे. दक्षिण सीरियातील ड्रुझ नागरिकांविरुद्ध केल्या जाणाऱ्या कारवाईवर सैन्य लक्ष ठेवून आहे.'
इस्रायलचा सीरियावर हल्ला, त्याची सुरुवात कशी झाली?
सीरियाच्या सरकारी माध्यमांनी बुधवारी वृत्त दिले की, इस्रायलने प्रामुख्याने स्वैदा शहराला लक्ष्य केले. सोमवारी ड्रुझ लढाऊ आणि बेदौइन सशस्त्र गटांमधील लढाई दडपण्यासाठी सरकारी सैन्याने शहरात प्रवेश केला, तेव्हा हा संपूर्ण संघर्ष सुरू झाला. ड्रुझ लढाऊ आणि सरकारी दलांमध्ये लढाई सुरू झाली. दोन्ही बाजूंमध्ये युद्धबंदी होती, परंतु त्याचे वारंवार उल्लंघन केले जात आहे.
स्थानिक वृत्तसंस्था स्वैदा२४ नुसार, स्वैदा शहर आणि आजूबाजूच्या गावांना जोरदार स्फोटांचा आणि तोफगोळ्यांचा फटका बसला. सीरियाच्या संरक्षण मंत्रालयाने राज्य वृत्तसंस्था सानाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की स्वैदामधील बेकायदेशीर गट युद्धबंदीचे उल्लंघन करत आहेत.