"रुग्णालय, शवागार, टॉयलेट सर्वत्र मृतदेह; गाझामध्ये..."; WHO प्रमुखांनी सांगितली भीषण परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 12:49 PM2023-11-03T12:49:23+5:302023-11-03T12:55:50+5:30

टेड्रोस एडनोम घेब्रेयसस यांनी गंभीर इशारा दिला की, गाझा पट्टीतील रुग्णालये जबरदस्तीने रिकामी केल्याने शेकडो रुग्णांचा जीव धोक्यात येईल.

israel hamas war who chief tedros ghebreyesus says doctors in gaza performing surgeries without anesthesia | "रुग्णालय, शवागार, टॉयलेट सर्वत्र मृतदेह; गाझामध्ये..."; WHO प्रमुखांनी सांगितली भीषण परिस्थिती

"रुग्णालय, शवागार, टॉयलेट सर्वत्र मृतदेह; गाझामध्ये..."; WHO प्रमुखांनी सांगितली भीषण परिस्थिती

जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख टेड्रोस एडनोम घेब्रेयसस यांनी गंभीर इशारा दिला की, गाझा पट्टीतील रुग्णालये जबरदस्तीने रिकामी केल्याने शेकडो रुग्णांचा जीव धोक्यात येईल. डब्ल्यूएचओ प्रमुख म्हणाले की, जमिनीवरची परिस्थिती अशी आहे की त्याचे वर्णन करणं कठीण आहे.

घेब्रेयसस म्हणाले, "गाझा शहर आणि उत्तर गाझामधील 23 रुग्णालये रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि या परिस्थितीत जबरदस्तीने स्थलांतरित केल्याने शेकडो रुग्णांचे जीव धोक्यात येऊ शकतात. युद्धात 10,000 हून अधिक लोक मारले गेले आहेत, ज्यात गाझामधील 8,500 हून अधिक आणि इस्रायलमधील 1,400 हून अधिक लोकांचा समावेश आहे. दोन्ही बाजूंनी मृत्यू झालेल्यांमध्ये प्रामुख्याने महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे."

जिनिव्हा येथे पत्रकार परिषदेत बोलताना टेड्रोस एडनोम घेब्रेयसस म्हणाले, "गाझामध्ये घडणाऱ्या भीषण घटनांबद्दल आमच्याकडे शब्द कमी आहेत. 21 हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. याशिवाय 14 लाख लोक बेघर झाले आहेत. ते बऱ्याच काळापासून समस्यांनी वेढलेले असतील, म्हणून त्यांना शक्य तितक्या लवकर काळजी घेणे आवश्यक आहे."

बुधवारी रफाह क्रॉसिंग उघडल्यानंतर 46 लोकांना इजिप्तच्या फील्ड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले. डब्ल्यूएचओने सांगितलं की गाझामध्ये 54 मेट्रिक टन वैद्यकीय मदत देण्यात आली, परंतु ती अपुरी आहे. टेड्रोस म्हणाले, "गाझामध्ये रुग्णालये भरली आहेत, शवगृहे भरली आहेत, शौचालये भरलेली आहेत, यामुळे रोगाचा धोका वाढत आहे. डॉक्टर एनेस्थीसिया न देता जखमींवर शस्त्रक्रिया करत आहेत."

Web Title: israel hamas war who chief tedros ghebreyesus says doctors in gaza performing surgeries without anesthesia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.