ट्रम्प, नेतन्याहू, हमास..; गाझावर नियंत्रण आवश्यक, पण निष्पाप लोकांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 22:09 IST2025-02-27T22:07:13+5:302025-02-27T22:09:55+5:30

Israel-Hamas War : इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षात आतापर्यंत 48300 हून अधिक लोक मारले गेले आहेत.

Israel-Hamas War: Trump, Netanyahu and Hamas...who is responsible for the deaths of innocent people? | ट्रम्प, नेतन्याहू, हमास..; गाझावर नियंत्रण आवश्यक, पण निष्पाप लोकांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

ट्रम्प, नेतन्याहू, हमास..; गाझावर नियंत्रण आवश्यक, पण निष्पाप लोकांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

Israel-Hamas War : गाझामध्ये सुरू असलेला संघर्ष आणि इस्रायलच्या हल्ल्यांमुळे परिस्थिती आणखी बिकट बनली आहे. थंडीमुळे नवजात बालकांचा मृत्यू होत आहे, तर रुग्णालये आणि आरोग्य सेवांची तीव्र कमतरता आहे. अशातच, डोनाल्ड ट्रम्प यांच्या गाझावरील ताबा घेण्याच्या प्रस्तावामुळे तेथील लोकही घाबरले आहेत. इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षात आतापर्यंत 48300 हून अधिक लोक मारले गेले आहेत. युनायटेड नेशन्सच्या म्हणण्यानुसार, गाझातील 70% पायाभूत सुविधा नष्ट झाल्या आहेत.

गाझामध्ये सुरू असलेला संघर्ष आता आणखी एक भयावह वळण घेत आहे. इस्रायलच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झालेल्या भागात आता थंडीमुळे मृत्यू होत आहेत. नुकतेच गाझामध्ये सात नवजात बालकांचा थंडीमुळे मृत्यू झाला. रुग्णालयांची मोठ्या प्रमाणात नासधूस, औषधे आणि साधनसामग्रीचा प्रचंड तुटवडा यामुळे तेथील लोकांना मूलभूत आरोग्य सेवाही मिळू शकत नाहीत. या संपूर्ण संकटादरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या गाझावरील नियंत्रणाच्या चर्चेने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

ट्रम्प यांच्या प्रस्तावामुळे तणाव वाढेल ?
डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच गाझा संदर्भात एक प्रस्ताव मांडला होता, ज्यामध्ये त्यांनी गाझा ताब्यात घेण्याचे वक्तव्य केले होते. ट्रम्प यांच्या या विधानामुळे प्रादेशिक अस्थिरता आणखी वाढण्याची शक्यता आहे. नुकताच त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'ट्रुथ सोशल' वर AI व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये ते इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासोबत गाझामध्ये आराम करताना दाखवण्यात आले आहे. या प्रस्तावामुळे पॅलेस्टिनी बाजूचा संताप तर होऊ शकतोच, पण त्यामुळे इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील संबंधांना नवे वळणही येऊ शकते.    

हमास, नेतन्याहू आणि इस्रायल
7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर इस्रायलने गाझावर मोठ्या प्रमाणात हल्ले सुरू केले. आतापर्यंत 48,300 हून अधिक लोक मारले गेले आहेत, ज्यात बहुतांश महिला आणि मुलांचा समावेश आहे. सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांमुळे गाझामधील आरोग्य सेवा पूर्णपणे कोलमडली आहे. अन्न, शुद्ध पाणी आणि वैद्यकीय सेवेच्या तीव्र अभावामुळे गाझा नरक बनला आहे. हे संकट सोडवण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला राजनैतिक उपाय शोधावे लागतील. युद्धविराम आणि मदतकार्य लवकर तीव्र केले नाही, तर परिस्थिती आणखी भीषण होऊ शकते.

Web Title: Israel-Hamas War: Trump, Netanyahu and Hamas...who is responsible for the deaths of innocent people?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.