शहरं
Join us  
Trending Stories
1
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
2
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
3
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
4
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
5
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
6
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
7
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
8
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
9
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
10
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
11
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
12
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
13
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
14
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
15
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
16
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
17
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
18
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
19
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
20
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या

विराम संपला, युद्ध सुरू; २०० ठिकाणांवरील हल्ल्यात १०९ जण ठार, पॅलेस्टिनी नागरिकांच्या हालअपेष्टांत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 06:40 IST

Israel-Hamas war: आठवडाभराच्या युद्धविरामाची मुदत शुक्रवारी संपल्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीवर पुन्हा हवाई हल्ले सुरू केले. यात हमासच्या २०० हून अधिक ठिकाणांवर मारा करण्यात असून,  १०९ पेक्षा अधिक जणांचा मृत्यू तर शेकडोजण जखमी झाले आहेत.

गाझा पट्टी - आठवडाभराच्या युद्धविरामाची मुदत शुक्रवारी संपल्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीवर पुन्हा हवाई हल्ले सुरू केले. यात हमासच्या २०० हून अधिक ठिकाणांवर मारा करण्यात असून,  १०९ पेक्षा अधिक जणांचा मृत्यू तर शेकडोजण जखमी झाले आहेत.

हमास ही दहशतवादी संघटना नष्ट करण्याच्या उद्देशानेच इस्रायलने ही लष्करी कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे पॅलेस्टिनी नागरिकांच्या हालअपेष्टांत आणखी वाढ झाली आहे. दक्षिण गाझातील पॅलेस्टिनी रहिवाशांनी आपली घरेदारे सोडून सुरक्षित ठिकाणी निघून जावे, असे आवाहन करणारी पत्रके इस्रायलच्या विमानांनी या भागात टाकली आहेत. 

भारताकडे मदतीची याचनादुबई : हमासने ओलीस ठेवलेल्यांपैकी उर्वरित लोकांची सुटका होण्यासाठी भारताने मदत करावी अशी विनंती इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हेर्झोग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुक्रवारी केली. हमासने इस्रायलमध्ये केलेला हल्ला, तसेच घडविलेले हत्याकांड यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र निषेध केल्याची माहिती हेर्झोग यांच्या प्रवक्त्याने दिली. अनेक लोक अजूनही हमासच्या ताब्यात असून त्यांचे भविष्य अधांतरी आहे. इस्रायल-पॅलेस्टाइनमधील संघर्षाच्या मुद्द्यावर राजनैतिक पातळीवरून व चर्चेच्या माध्यमातून शक्यतो लवकर तोडगा काढावा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हेर्गोझ यांना सांगितले. 

- १५,०००पेक्षा अधिक गाझातील नागरिक इस्रायली सैन्याने केलेल्या हल्ल्यात ठार झाले आहेत.७ ऑक्टोबरपासून इस्रायल हमास युद्धाला सुरुवात झाली आहे.- ६,०००पेक्षा अधिक लहान मुलांचा युद्धात बळी गेला आहे.- २५० इस्रायली व अन्य देशांच्या नागरिकांना हमासच्या दहशतवाद्यांनी पकडून नेले व ओलीस ठेवले.- १०० जणांची हमासने सुटका केली. आठ ओलिसांची गुरुवारी झाली सुटकाहमासच्या ताब्यातील ओलिसांपैकी आणखी आठ इस्रायली नागरिकांची गुरुवारी सुटका करण्यात आली. त्या बदल्यात इस्रायलने ३० पॅलेस्टिनी कैद्यांची शुक्रवारी पहाटे सुटका केली. मात्र, युद्धविरामाची मुदत संपल्याने युद्धाला पुन्हा सुरुवात झाली आहे. इस्रायल व हमासमध्ये चर्चेसाठी कतार देशाने मध्यस्थी केली होती. पुन्हा युद्धविराम होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे कतारने म्हटले आहे. 

नागरिक टार्गेट नको अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी इस्रायली अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. युद्धात हल्ले करताना पॅलेस्टाइनच्या नागरिकांना लक्ष्य करू नका, अशी सूचनाही ब्लिंकन यांनी इस्रायलला केली. 

 

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष