शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गाझामधील हिंसाचार बेधडकपणे जगासमोर आणणाऱ्या ४ पत्रकारांना नोबेल पुरस्कारासाठी नामांकन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 11:54 IST

Gaza Journalism Nobel Prize, Israel Hamas War: यावर्षी नोबेल पारितोषिक विजेत्यांची घोषणा १० ऑक्टोबर रोजी केली जाणार आहे.

Gaza Journalism Nobel Prize, Israel Hamas War: गाझामध्ये युद्धाच्या भीषण परिस्थितीतही आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून लष्कराच्या कारवाया आणि गाझामधील नागरिकांची दयनीय अवस्था जगाला दाखविणाऱ्या गाझातील चार पत्रकारांची यंदाच्या नोबेल पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. यावर्षी नोबेल पारितोषिक विजेत्यांची घोषणा १० ऑक्टोबर रोजी केली जाणार आहे. नोबेल पुरस्कार हा सहा वेगवेगळ्या क्षेत्रात दिला जाणारा प्रतिष्ठित पुरस्कार आहे. हा पुरस्कार अशा लोकांना दिला जातो, ज्यांनी गेल्या वर्षभरात सर्वसामान्य जनतेला लाभ मिळवून देण्यासाठी कार्य केले आहे.

हमास आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेला संघर्ष कव्हर केल्याबद्दल छायाचित्रकार मोताझ अझैझा, टीव्ही रिपोर्टर हिंद खोदरी, पत्रकार आणि कार्यकर्ता बिसान ओवदा आणि गाझा येथील ज्येष्ठ रिपोर्टर वेल अल-दहदौह यांची नोबेल पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आली आहे.

(डावीकडून) फोटो पत्रकार मोताज़ अज़ाइज़ा, टीवी रिपोर्टर हिंद ख़ुदरी, पत्रकार और कार्यकर्ता बिसन ओवदा और वरिष्ठ रिपोर्टर वाएल अल-दहदौह

अझिझाने सोशल मीडियावर पोस्ट केले, "गाझामधील अत्याचार जगासमोर आणल्याल्याबद्दल मला २०२४ च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. मला शुभेच्छा द्या आणि मला आशा आहे की माझ्या लोकांना आता शांती मिळेल. पॅलेस्टाईन भयमुक्त व्हावे हीच सदिच्छा." टीव्ही रिपोर्टर हिंद खोदरी यांनी आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिले, "माझ्या लोकांची हत्या होत असताना अशा नोबेल पुरस्काराचे काय? गेले ३०० दिवस लोक मरत आहेत आणि काहीही बदलले नाही. याचा काय उपयोग झाला? या बक्षीसाबद्दल मी आनंदी किंवा दु:खी काहीही नसेन.”

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsraelइस्रायलNobel Prizeनोबेल पुरस्कारJournalistपत्रकार