हमासला मोठा धक्का! इस्रायली वायुसेनेने अॅडव्हान्स डिटेक्शन सिस्टम नष्ट केली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 14:34 IST2023-10-11T14:31:05+5:302023-10-11T14:34:28+5:30
गाझा पट्टीतील विमानांवर नजर ठेवण्यासाठी हमासने अॅडव्हान्स डिटेक्शन सिस्टम बसवली होती. मात्र इस्रायलच्या लढाऊ विमानांनी या यंत्रणेवर बॉम्बफेक करुन ती नष्ट केली आहे.

हमासला मोठा धक्का! इस्रायली वायुसेनेने अॅडव्हान्स डिटेक्शन सिस्टम नष्ट केली
हमासच्या दहशतवाद्यांना मोठा फटका बसला आहे. गाझा पट्टीत इस्रायली लढाऊ विमाने आणि विमानांवर नजर ठेवण्यासाठी दहशतवादी संघटनेने अॅडव्हान्स डिटेक्शन सिस्टम बसवली होती. या तंत्रज्ञानाच्या मदतीने गाझावरून येणाऱ्या-जाणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या विमानांवर लक्ष ठेवता येत होते. यासाठी हमासने गाझा पट्टीतील अनेक इमारतींच्या छतावर उच्च दर्जाचे कॅमेरे बसवले होते.
कोसळत्या इमारती, अस्ताव्यस्त मृतदेह, इस्राइलच्या हल्ल्यात गाझाची राखरांगोळी, शहारे आणणारे फोटो
हे कॅमेरे सौर पॅनेलच्या खाली लपून बसवण्यात आले होते, जेणेकरून ते दिसू नयेत. तसेच ड्रोन, विमान किंवा उपग्रहाद्वारे त्यांचा शोध घेता येत नाही. मात्र इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमुळे हमासचे हे ट्रॅकिंग नेटवर्क मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाले आहेत.
इस्त्रायलच्या एअरफोर्सने सांगितले की, त्यांच्या फाईटर जेटने १० आणि ११ ऑक्टोबरच्या रात्री ही सर्व सिस्टीम नष्ट केली. इस्त्रायलच्या एअर फोर्सने ट्रॅकिंग नेटवर्कचा शोध गेऊन प्रत्येक इमारतीवरील नष्ट केले. ही सिस्टीम इस्त्रायलच्या विमानांवर लक्ष ठेवण्याचे काम करत होती. आता हमासला यावर नजर ठेवता येणार नाही.
बर्याच ठिकाणी इस्रायलचे काम दूरस्थपणे चालवलेल्या हवाई वाहनांद्वारे म्हणजेच अॅटॅक ड्रोनद्वारे केले जाते. हे ड्रोन रात्री घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना शोधून ठार करतात. इस्रायलच्या लढाऊ विमानांनी काल रात्री गाझा पट्टीतील बीट हानौनमध्ये ८० ठिकाणी हल्ले केले.
गाझामध्ये हमासला निधी देण्यासाठी दोन्ही बँकांनी मदत केली. याशिवाय हवाई दलाने बोगद्यांची साखळी उद्ध्वस्त केली आहे. तसेच हमासच्या दहशतवाद्यांचे दोन सक्रिय कमांड सेंटर उडवून देण्यात आले आहेत. याशिवाय इस्रायलने हमास कमांडर मुहम्मद ओस्माइलचे घर उडवले आहे. हमासच्या अँटी-टँक मिसाईल युनिटचा कमांडर मारला गेला आहे.
अश्कलोनमध्ये शेकडो दहशतवादी मारले गेले आहेत. गाझामध्ये हमासच्या दहशतवाद्यांचे जे काही फ्लॅट्स किंवा घरे होती ती नष्ट करण्यात आली आहेत. हमासचे लष्करी कंपाऊंड उडवण्यात आले आहे. शस्त्रास्त्रांचा डेपो उद्ध्वस्त झाला आहे. निरीक्षण आणि ट्रान्समिशन टॉवरचे तुकडे झाले आहेत. याशिवाय अनेक उंच इमारती पाडण्यात आल्या आहेत, त्या हमाससाठी वापरल्या जात होत्या.