शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायल हमास संघर्ष: युद्धबंदीनंतरही हल्ले सुरूच, गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यात १०० जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 07:49 IST

Israel Hamas War, ceasefire violation : १५ महिन्यांपासून सुरु असलेल्या संघर्षाला बुधवारी युद्धविराम लावण्याची घोषणा करण्यात आली होती

Israel Hamas War, ceasefire violation : १५ महिन्यांपासून पॅलेस्टाईनच्या गाझामध्ये सुरू असलेल्या इस्रायल-हमास संघर्षावर तोडगा अंतिम टप्प्यात असल्याचे या दोन्ही देशांत मध्यस्थी करणाऱ्या कतार व अमेरिकेने बुधवारी जाहीर केले आहे. याबाबत दोन्ही बाजूंनी एक सुवर्णमध्य मान्य केला. पण युद्धबंदी कराराच्या घोषणेनंतरही हल्ले सुरुच आहेत. इस्रायलने गाझामध्ये पुन्हा एकदा हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यातील मृतांची संख्या १०० वर पोहोचली आहे. मृतांमध्ये अनेक लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविराम करार बुधवारी जाहीर करण्यात आला. कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल सानी यांनी ही घोषणा केली.

युद्धबंदी कराराचे उल्लंघन

१५ महिन्यांपासून सुरू असलेले विनाशकारी युद्ध संपवण्यासाठी आणि अनेक इस्रायली ओलिसांची सुटका करण्यासाठी या युद्धबंदीची घोषणा करण्यात आली होती, परंतु दुसऱ्याच दिवशी म्हणजे गुरुवारी इस्रायलने गाझामध्ये हवाई हल्ला केला. अल सानी यांनी सांगितले की, इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविराम करार रविवार, १९ जानेवारीपासून लागू होईल. मात्र याआधीच इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.

या आधीही झाला होता युद्धविराम

युद्धविराम कराराच्या घोषणेनंतर युद्ध संपेल असे वाटत होते, परंतु तसे झाले नाही. दोघांनी युद्धविराम करारावर एकमत केले होते. नोव्हेंबर २०२३ मध्ये इस्रायल आणि हमास यांच्यात सात दिवसांचा युद्धविराम झाला होता. या काळात गाझामधून १०० हून अधिक ओलिसांची सुटका करण्यात आली होती.

युद्धबंदी करारावर इस्रायलचे मत काय होते?

युद्धबंदी कराराबाबत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले होते की, हमासला नव्या मागण्या सोडाव्या लागतील. सध्या युद्धबंदीवर कोणतीही बैठक होणार नाही. युद्ध मंत्रिमंडळ याबाबत अद्याप निर्णय घेणार नाही. गाझामध्ये हमासला माघार घ्यावी लागेल. हमास वचन मोडत आहे. इस्रायलच्या पंतप्रधानांच्या या वक्तव्यानंतर हमासनेही इस्रायलला इशारा दिला होता. इस्रायलचा नायनाट होईल. ओलीस करार हा इस्रायलचा पराभव आहे, असे म्हणत हमासने इस्रायला चिथवले होते. त्याचाच परिणाम युद्धबंदी कराराच्या उल्लंघनातून दिसून आला.

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsraelइस्रायलGaza Attackगाझा अटॅकCeasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघन