शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

संघर्ष भडकणार! इराणच्या तळावर हल्ला करताना इस्त्रायलचे F-16 फायटर जेट पाडले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2018 5:32 PM

सीरियाच्या युद्धात पहिल्यांदाच इस्त्रायलने आपले फायटर विमान गमावले आहे. इस्त्रायलच्या हद्दीत इराणचे ड्रोन विमान दिसल्यानंतर इस्त्रायलने हवाई हल्ले केले.

ठळक मुद्देकोसळण्याआधी इस्त्रायलच्या लढाऊ विमानाने सीरियन एरियल डिफेन्स सिस्टिम आणि सीरियामधील इराणच्या 12 लक्ष्यांवर हल्ला केला.इस्त्रायलने सीरियामध्ये हल्ले करण यात नवीन काही नाहीय पण इस्त्रायलचे लढाऊ विमान पडल्यामुळे संघर्ष अधिक भडकू शकतो.

जेरुसलेम -  सीरियामध्ये सुरु असलेल्या युद्धात शनिवारी इस्त्रायली एअर फोर्सचे एफ-16 हे फायटर विमान पाडण्यात आले. इराणचे ड्रोन विमान दिसल्यानंतर त्या दिशेने झेपावलेल्या एफ-16 फायटर जेटला विमानविरोधी अस्त्रे डागून पाडण्यात आले. इस्त्रायलच्या लष्कराने ही माहिती दिली आहे. विमान कोसळण्याआधी दोन वैमानिकांनी पॅराशूटच्या सहाय्याने उडया मारल्याने ते बचावले. 

सीरियाच्या युद्धात पहिल्यांदाच इस्त्रायलने आपले फायटर विमान गमावले आहे. इस्त्रायलच्या हद्दीत इराणचे ड्रोन विमान दिसल्यानंतर इस्त्रायलने हवाई हल्ले केले. सीरियाने इस्त्रायल अतिआक्रमकता दाखवत असल्याचा आरोप केला आहे. कोसळण्याआधी इस्त्रायलच्या लढाऊ विमानाने सीरियन एरियल डिफेन्स सिस्टिम आणि सीरियामधील इराणच्या 12 लक्ष्यांवर हल्ला केला असे इस्त्रायलच्या संरक्षण विभागाकडून सांगण्यात आले. 

इस्त्रायलने सीरियामध्ये हल्ले करण यात नवीन काही नाहीय पण इस्त्रायलचे लढाऊ विमान पडल्यामुळे संघर्ष अधिक भडकू शकतो. या निमित्ताने इस्त्रायलाने प्रथमच जाहीरपणे सीरियामध्ये हल्ले करत असल्याचे मान्य केले आहे. सीरियामध्ये इराणच्या सैनिकांच्या तैनातीवर इस्त्रायलने अलीकडे अनेकदा इशारा दिला आहे. इराणच्या या मानवरहीत टेहळणी विमानाने सीरियामधून आमच्या हद्दीत प्रवेश केला होता असे इस्त्रायलच्या संरक्षण विभागाकडून सांगण्यात आले. 

टॅग्स :Israelइस्रायल