शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

इस्रायलचा हमास आणि हिजबुल्लाहवर 'डबल अटॅक'... एक कमांडर आणि दोन दहशतवादी ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 22:09 IST

इस्रायली लष्कराने दहशतवादी संघटना हिजबुल्लाहच्या दोन दहशतवाद्यांनाही ठार केले आहे.

हमास आणि हिजबुल्लाहसोबतच्या युद्धात इस्रायलला मोठे यश मिळाले आहे. इस्रायली सैन्याने केलेल्या हवाई हल्ल्यात अयमान नोफल (Ayman Nofal) ठार झाला आहे. तो हमासचा वरिष्ठ कमांडर असल्याचे सांगितले जाते. इस्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार, अयमान हा हमासच्या जनरल मिलिटरी कौन्सिलचा सदस्य होता. याशिवाय, इस्रायली लष्कराने दहशतवादी संघटना हिजबुल्लाहच्या दोन दहशतवाद्यांनाही ठार केले आहे.

इस्त्रायल सध्या दोन आघाड्यांवर युद्ध लढत आहे. एकीकडे ते गाझा पट्टीतून हमासच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत आहे. दुसरीकडे, हिजबुल्लाहचे दहशतवादी लेबनॉनमधून हल्ले करत आहेत, त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायल हवाई हल्ले करत आहे. आता इस्रायली लष्कराने हमास कमांडर मारला गेल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी हवाई हल्ल्यात आपले सदस्य मारले गेल्याची कबुली खुद्द हिजबुल्लाहने दिली आहे. हिजबुल्लाहने त्यांची नावे अब्बास फैसी आणि मोहम्मद अहमद काझिम अशी ठेवली आहेत.

हिजबुल्लाहने एक व्हिडीओही जारी केला आहे. ज्यात सूड कारवाईचे म्हटले जात आहे. यामध्ये संघटनेने एका कारला लक्ष्य करत क्षेपणास्त्र डागले आहे. इस्रायलच्या मेतुला शहरावर हा हल्ला झाला आहे. अनेक देश दहशतवादी संघटना मानणाऱ्या गाझा पट्टीतून कार्यरत असलेल्या हमास या संघटनेने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केला होता. यामध्ये हमासचे लढाऊ जमीन आणि हवाई मार्गाने इस्रायलमध्ये घुसले. या हल्ल्यात 1300 इस्रायली लोकांचा मृत्यू झाला होता. इस्रायलने दावा केला आहे की, हमासने सुमारे 200 लोकांना ओलीस ठेवले आहे. तेव्हापासून गाझा पट्टीवर इस्रायलचा कहर सुरूच आहे. 

इस्रायलने हमासचा नायनाट करण्याचा निर्णय घेतला आहे. या युद्धाने जग दोन गटात विभागले आहे. जिथे अमेरिका, ब्रिटन वगैरे इस्रायलच्या पाठीशी उभे आहेत. तर अरब देश पॅलेस्टाईन म्हणजेच गाझासोबत आहेत. गाझा पट्टीवरील हल्ले थांबवले नाहीत तर संपूर्ण जगातील मुस्लिम आणि प्रतिकार शक्तींना कोणीही रोखू शकणार नाही, अशी धमकी इराणने दिली आहे. या युद्धात कोणताही तिसरा देश किंवा पक्ष उतरला तर ते योग्य होणार नाही, असे अमेरिकेने म्हटले आहे. पण दरम्यानच्या काळात लेबनीज संघटना हिजबुल्लाहने या युद्धात उडी घेतली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन हेही इस्रायलला पोहोचले आहेत. त्याआधी अमेरिकेने आपली दुसरी विमानवाहू युद्धनौका इस्रायलच्या दिशेने पाठवली आहे. 2000 अमेरिकन सैनिक मानवतावादी मदत देण्यासाठी इस्रायलमध्ये पोहोचले आहेत. दरम्यान, दिलासा देणारी एकमेव बातमी म्हणजे आता इस्रायलने गाझा पट्टीत आंतरराष्ट्रीय मानवतावादी मदत पुरवण्यास परवानगी दिली आहे.  

इजिप्तमधूनही मानवतावादी मदत पाठवली जात आहे, परंतु अद्यापपर्यंत ओलिसांच्या संकटावर तोडगा निघालेला दिसत नाही. गाझावर हल्ला करणे थांबवल्यास ओलिसांची सुटका करण्याची तयारी हमासने यापूर्वी दिली होती. इस्त्रायलने म्हटले आहे की ते प्रथम हमासचा नाश करेल आणि नंतर ओलीसांना सोडवेल. आता हमासने इस्रायलमध्ये कैदेत असलेल्या 6 हजार पॅलेस्टिनींची सुटका केल्यास ओलिसांची सुटका केली जाईल, अशी ऑफर दिली आहे.

टॅग्स :Israelइस्रायलIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्ध