Iran Plane Attack: इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर सुरू केलेल्या भीषण हल्ल्यांनी आता नागरी हवाई वाहतूक आणि अण्वस्त्र प्रकल्पही कचाट्यात सापडले आहेत. दक्षिण इराणमधील बुशेर विमानतळावर झालेल्या इस्रायली क्षेपणास्त्र हल्ल्यात इराण एअरचे एक प्रवासी विमान धावपट्टीवरच जळून खाक झाले. या घटनेमुळे आखाती देशांमधील तणाव शिगेला पोहोचला असून, रशियाने आपल्या अणुऊर्जा प्रकल्पाचे काम तूर्तास थांबवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
विमानतळावरच विमानाचा कोळसा
रॉयटर्स आणि स्थानिक इराणी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, बुशेर या बंदर शहरात असलेल्या विमानतळाला इस्रायलने लक्ष्य केले. यावेळी तिथे उभं असलेलं इराण एअरचं प्रवासी विमान आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. हे विमान त्यावेळी सेवेत होतं की नाही किंवा त्यात प्रवासी होते का, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र, नागरी विमानावर झालेल्या या हल्ल्यामुळे युद्धाचे स्वरुप बदलले आहे.
मेहराबाद विमानतळावरही धुराचे लोट
केवळ बुशेरच नाही, तर राजधानी तेहरानमधील महत्त्वाचे मेहराबाद विमानतळ देखील या हल्ल्यातून सुटलेले नाही. देशांतर्गत विमान वाहतुकीचे मुख्य केंद्र असलेल्या या विमानतळाच्या धावपट्टीजवळ प्रचंड स्फोट झाले. समोर आलेल्या फोटोंमध्ये धावपट्टीच्या मागे धुराचे लोट दिसत आहेत. इराणी माध्यमांनी याला अमेरिकन-झिओनिस्ट दहशतवादी हल्ला असे म्हटले आहे.
रशियाचा मोठा निर्णय; अणुप्रकल्पाचे काम बंद
या युद्धाचा सर्वात मोठा फटका इराणच्या महत्त्वाकांक्षी अणुकार्यक्रमाला बसला आहे. रशियाची सरकारी अणू संस्था रोसाटॉमने बुशेर येथील दुसऱ्या आणि तिसऱ्या युनिटचे बांधकाम थांबवल्याची घोषणा केली आहे. रोसाटॉमचे प्रमुख अलेक्सी लिखचेव्ह यांनी सांगितले की, अणुप्रकल्पापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. इराणच्या अणू उद्योगातील वरिष्ठ नेतृत्वाशी कोणताही संपर्क होऊ शकत नसल्याचेही त्यांनी कबूल केले आहे.
रशियन नागरिकांची मायदेशी पाठवणी
इराणमध्ये सध्या ६३९ रशियन कर्मचारी अडकलेले आहेत. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रशियाने आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. शनिवारपासून सुरू झालेल्या या हल्ल्यांनंतर आतापर्यंत १०० कामगार आणि त्यांच्या कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. हवाई हल्ल्यांमध्ये विश्रांती मिळताच उर्वरित नागरिकांनाही बाहेर काढले जाईल, असे रशियाने स्पष्ट केले आहे.
Web Summary : Israeli strikes in Iran hit a passenger plane and Tehran airport. Russia halted work on its Iranian nuclear project and is evacuating citizens due to escalating conflict.
Web Summary : ईरान में इजरायली हमलों में यात्री विमान और तेहरान हवाई अड्डा प्रभावित। रूस ने ईरानी परमाणु परियोजना पर काम रोक दिया और बढ़ते संघर्ष के कारण नागरिकों को निकाल रहा है।