शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 15:29 IST

महत्वाचे म्हणजे, अमेरिकेने आपल्या दूतावासांमधून राजदूतांना परत बोलावले आहे, यामुळे सर्व काही सामान्य नाही. याशिवाय, ट्रॅव्हल अॅडव्हायजरीही जारी करण्यात आली आहे.

गाझा युद्धानंतरइस्रायल आणखी एका देशावर मोठा हल्ला करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे झाल्यास, जगात आणखी एका मोठ्या युद्धाला तोंड फुटेल. अमेरिकन वृत्तपत्र न्यू यॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, इस्रायल कुठल्याही क्षणी इराणवर मोठा हल्ला करू शकतो. महत्वाचे म्हणजे, सर्वसाधारणपणे अमेरिकेच्या मदतीने लष्करी कारवाया करणारा इस्रायल, यावेळी त्याच्याशिवाय हा हल्ला करू शकतो. पण असे झाल्यास मध्य पूर्वेत तणाव वाढू शकतो. खरे तर, इराणसोबत अणु करारासाठी डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. अशा परिस्थितीत, जर इस्रायलने इराणवर हल्ला केला, तर परिस्थिती सुधारण्याऐवजी अधिक बिघडू शकते.

अमेरिकेने मध्य पूर्वेतील इराक, बहरीन आणि कुवेत या तीन देशांमधील आपल्या राजदूतांना परत बोलावण्यास सुरुवात केली असून हा चिंता वाढवणारा विषय आहे. खरे तर, इस्रायलच्या हल्ल्याच्या भीतीनेच अमेरिकेने आपले राजदूतांना परत बोलावले आहे. जर इस्रालने हल्ला केला, तर इराणही शांत बसणार नाही, तोही प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करेल. मात्र, इस्रायलचा नेमका प्लॅन काय यासंदर्भात अद्याप कसलीही माहिती समोर आलेली नाही. मात्र बेंजामिन नेतन्याहू मागे हटण्यास तयार नाहीत, असे बोलले जात आहे. 

ट्रम्प फोनवरून बोलले, पण नेतन्याहू ठाम -अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच नेतन्याहू यांच्यासोबत फोनवरून दीर्घ चर्चा केली. माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेची इराणसोबत अण्वस्त्र करार करण्याची इच्छा आहे. यामुळे इराणवर हल्ला करू नये, असे डोनाल्ड ट्रम यांनी नेतन्याहू यांच्या सोबत होलताना म्हटले आहे. मात्र आपण कोणत्याही परिस्थितीत इराणला युरेनियमचा साठा वाढवू देणार नाही, ज्यातून अण्वस्त्रे बनवता येतील, असे इस्रायलचे म्हणणे आहे. 

महत्वाचे म्हणजे, अमेरिकेने आपल्या दूतावासांमधून राजदूतांना परत बोलावले आहे, यामुळे सर्व काही सामान्य नाही. याशिवाय, ट्रॅव्हल अॅडव्हायजरीही जारी करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Israelइस्रायलAmericaअमेरिकाIranइराणwarयुद्ध