इस्रायली सैन्याने पूर्व गाझा शहराच्या जैतून भागात एका निवासी क्षेत्राला टार्गेट करत भीषण एअरस्ट्राईक केला आहे. रिपोर्टनुसार, हा हल्ला असकुला जंक्शनजवळ असलेल्या एका तीन मजली इमारतीवर करण्यात आला. हल्ल्यानंतर परिसरात आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट पाहिला मिळाले, ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही घटना अशा वेळी समोर आली आहे जेव्हा अमेरिकन प्रशासनाने जानेवारीत जाहीर केलं होतं की, युद्धविराम कराराचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या टप्प्यात गाझामधून इस्रायली सैन्याची अतिरिक्त माघार आणि पुनर्निर्माण कार्याला सुरुवात होणं अपेक्षित आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार, गाझाच्या पुनर्रचनेसाठी सुमारे ७० अब्ज डॉलर्सचा खर्च येऊ शकतो.
ऑक्टोबर २०२३ मध्ये सुरू झालेली इस्रायली लष्करी कारवाई एका वर्षापेक्षा जास्त काळ चालली. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेत सुमारे ७२ हजार पॅलेस्टिनी मारले गेले असून १.७१ लाखांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. याव्यतिरिक्त गाझातील सुमारे ९० टक्के पायाभूत सुविधांचे मोठं नुकसान झालं आहे किंवा त्या पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत.
युद्धविराम लागू झाल्यानंतरही परिस्थिती पूर्णपणे शांत झालेली नाही. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे की, या काळात इस्रायली कारवायांमध्ये ५७४ लोकांचा मृत्यू झाला असून १,५१८ जण जखमी झाले आहेत. ही आकडेवारी समोर आल्यानंतर कराराचं पालन आणि क्षेत्रातील स्थिरतेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सध्या या भागात तणावाचं वातावरण आहे.
Web Summary : Israeli forces targeted a residential area in Gaza, striking a three-story building and causing significant damage and casualties. Despite ceasefire efforts, violence continues, with hundreds killed and infrastructure severely damaged. Reconstruction costs are estimated at billions, raising concerns about stability.
Web Summary : इजरायली सेना ने गाजा में एक रिहायशी इमारत पर हवाई हमला किया, जिससे भारी नुकसान हुआ और कई लोग हताहत हुए। युद्धविराम के प्रयासों के बावजूद, हिंसा जारी है, सैकड़ों लोग मारे गए हैं और बुनियादी ढांचे को गंभीर नुकसान पहुंचा है। पुनर्निर्माण की लागत अरबों में अनुमानित है, जिससे स्थिरता को लेकर चिंता बढ़ रही है।