शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

निर्वासितांवर इस्रायलचे बाॅम्ब; अनेक इमारती जमीनदोस्त; अनेक महिला, मुले ढिगाऱ्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 13:05 IST

इस्रायली लष्कराने आतापर्यंत हमासची ११ हजार ठिकाणे केली उद्ध्वस्त

रहाफ : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचा भडका दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी इस्रायली सैन्याने गाझा शहरातील निर्वासित छावणीवर हवाई हल्ला करून अनेक इमारती जमीनदोस्त केल्या. यावेळी, समोर आलेल्या फुटेजमध्ये बचाव कर्मचारी पुरुष, महिला आणि मुलांना ढिगाऱ्यातून बाहेर काढताना दिसत होते. यात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे.

इस्रायली लष्कराने सांगितले की, सैनिकांनी आतापर्यंत हमासची ११ हजार ठिकाणे उद्ध्वस्त केली आहेत. इस्रायलने म्हटले की, हल्ल्यामुळे घरांमध्ये उभारलेले हमासचे कमांड सेंटर आणि खाली पसरलेल्या बोगद्यांचे जाळे नष्ट झाले आहे. या दरम्यान रफाह बॉर्डर प्रथमच परदेशी नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहे. येथून सुमारे ४०० लोक इजिप्तला पोहोचणार आहेत. त्याचबरोबर जखमी पॅलेस्टिनी नागरिकही येथून बाहेर पडू शकतात.

बोलिव्हियाने इस्रायलशी राजनैतिक संबंध संपवले

ला पाझ : बोलिव्हियन सरकारने मंगळवारी इस्रायलशी राजनैतिक संबंध तोडले आणि गाझा पट्टीतील हमासविरुद्ध इस्रायली लष्करी हल्ले थांबवण्याचे आवाहन केले. बोलिव्हियाने गाझा पट्टीत सुरू असलेल्या इस्रायलच्या लष्करी हल्ल्याचा निषेध करत इस्रायलशी राजनैतिक संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे, असे बोलिव्हियाचे उपपरराष्ट्रमंत्री फ्रेडी ममानी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यापूर्वी २००९ मध्ये गाझा युद्धावरून बोलिव्हियाने इस्रायलशी राजनैतिक संबंध तोडले होते. २०२० मध्ये राजनैतिक संबंध पुन्हा पूर्ववत झाले.

इंटरनेट सेवा पुन्हा ठप्प

  • इस्रायलच्या हल्ल्यांमुळे गाझामध्ये इंटरनेट सेवा पुन्हा ठप्प झाल्या आहेत. यामुळे गाझामधील २० लाखांहून अधिक लोक जगभरातील नागरिकांशी संपर्क साधू शकत नाहीत. 
  • इस्रायलने सांगितले की, या काळात त्यांच्या ११ सैनिकांनाही आपले प्राण गमवावे लागले. आतापर्यंत ३२६ जवान शहीद झाले आहेत.

येमेनमधूनही इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले

इस्रायलविरोधात थेट युद्धात उतरण्याची घोषणा येमेनमधील हुथी बंडखोरांनी केल्यानंतर बुधवारी इस्रायलच्या एलत शहरावर ड्रोन, बॅलेस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. यातील काही क्षेपणास्त्रे हवेतच उडविल्याचा दावा इस्रायली लष्कराने केला आहे.

महागाईसह कच्च्या तेलाचा भडका उडण्याची शक्यता

  • रशिया आणि युक्रेन युद्धामुळे अगोदरच पुरवठा साखळी विस्कळीत झालेली असताना  इस्रायल आणि हमास युद्धामुळे त्यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
  • युद्ध दीर्घकाळ चालले तर याचा थेट परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर पडेल आणि रोजच्या वापरातील वस्तू प्रचंड महाग होतील, असा इशारा जागतिक बँकेने दिला आहे. 
  • युद्धाचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवरही होण्याची शक्यता असून, युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती १५० डॉलर प्रति बॅरलवर जाण्याची भीती आहे.

गाझातील मृत्यूस जबाबदार कोण?

  • ८,७९६ एकूण मृत्यू
  • ३,६४८ मुलांचा मृत्यू
  • २,२९० महिलांचा मृत्यू
  • २,२१९ जखमी
  • २,०२० नागरिक बेपत्ता
  • १,१२० मुले बेपत्ता
  • १३० डॉक्टर, नर्स मृत्यू
टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धGaza Attackगाझा अटॅकIsraelइस्रायल