शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 14:43 IST

Israel Iran conflict: इराणने इस्रायलमधील संघर्ष दिवसेंदिवस गंभीर वळणांवर पोहोचत असून, दोन्ही बाजूंनी क्षेपणास्त्र हल्ले करण्यात येत आहेत.

दुबई: इराणनेइस्रायलमधील संघर्ष दिवसेंदिवस गंभीर वळणांवर पोहोचत असून, दोन्ही बाजूंनी क्षेपणास्त्र हल्ले करण्यात येत आहेत. सोमवारी संध्याकाळी इस्रायलने पुन्हा एकदा इराणवर हवाई हल्ला केला. इस्रायलने इराणची राजधानी तेहरानमधील सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर बॉम्ब टाकले. हल्ल्याच्या वेळी एक महिला अँकर लाइव्ह शो करत होती. सुदैवाने ती या हल्ल्यात बचावली. या घटनेचा व्हिडीओही समोर आला असून त्यामध्ये अँकरला स्टुडिओतून पळताना दिसते. 

पंतप्रधान बेंझामिन नेतान्याहू यांनी इस्रायल विजयाच्या मार्गावर असल्याचे नमूद करून तेहरानच्या हवाई क्षेत्रावर इस्रायलचे नियंत्रण असल्याचे म्हटले आहे. इराणकडून आण्विक व क्षेपणास्त्र हल्ल्यांचा धोका कमी करण्याच्या दृष्टीने इस्रायलची आगेकूच सुरू असल्याचा दावा संरक्षण मंत्री काट्झ आणि लष्करप्रमुख जमीर यांनी केला आहे. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला असून, ते जी-७ शिखर परिषदेत म्हणाले की, इराण हे युद्ध जिंकणार नाही. खूप उशीर होण्यापूर्वी इराणी सरकारने वाटाघाटी कराव्यात. यादरम्यान, इराणशी लागून असलेल्या सीमा पाकिस्तानने बंद केल्या आहेत. 

अमेरिकी दूतावास इमारतीचे नुकसानतेल अवीवमधील अमेरिकी दूतावासाच्या इमारतीचे किरकोळ नुकसान झाल्याचे अमेरिकी राजदूत माईक हकाबी यांनी सांगितले. या हल्ल्यांत कोणीही जखमी झाले नसल्याचे हकाबी म्हणाले. 

तेहरान सोडा: इस्रायलइस्रायलच्या लष्कराने इराणची राजधानी तेहरानमधील लोकांना वस्त्या सोडून जा, असा इशारा दिला आहे. या शहरातील लष्करी ठिकाणांवर हल्ले केले जातील, असे लष्कराने बजावले. तेहरानमध्ये अनेक भागांत स्फोट झाले आहेत. इराण व इस्रायलमधील संघर्षात दोन्ही बाजुंनी क्षेपणास्त्र हल्ले करण्यात येत आहेत.  इराणने इस्रायलमधील तेल अवीव शहराला टार्गेट करत हल्ले केल्याने येथे अनेक स्फोटांचे आवाज येत आगीचे लोळ बाहेर पडत आहेत. इराणकडून तेल अवीव येथे सतत हल्ले होत असल्याने नागरिक पार्किंग गॅरेजमध्ये आश्रय घेत आहेत. यावेळी एक महिला बाळाला पोर्टेबल पंख्याने हवा घालताना दिसत आहे.

इराणमध्ये आण्विक केंद्रात किरणोत्सर्जनआंतरराष्ट्रीय आण्विक ऊर्जा संस्थेचे संचालक जनरल राफेल मारियानो ग्रॉसी यांनी इस्रायलच्या हल्ल्यांमुळे इराणचे मुख्य आण्विक केंद्र असलेल्या नतांज प्रकल्पात रेडिओलॉजिकल तसेच रासायनिक किरणोत्सर्जन झाल्याची शंका व्यक्त केली आहे. मारियानो यांच्यानुसार सध्या नतांज भागात किरणोत्सर्गाची पातळी सामान्य आहे. अजून तरी याचा नागरी वस्त्या किंवा पर्यावरणावर परिणाम झालेला नाही. 

भारतीयांनो  सतर्क राहाइराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोमवारी म्हटले की, इराणमधील भारतीय दूतावास तेथील स्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. इराणमध्ये असलेल्या भारतीय विद्यार्थी सुरक्षित राहावेत यासाठी आम्ही प्रयत्नशील असून, त्यांच्या संपर्कात आहोत. काही भारतीय विद्यार्थ्यांना इराणमधील अधिक सुरक्षित ठिकाणी हलवण्याची व्यवस्थादेखील दूतावासाने केली. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, सध्याच्या  स्थितीत इराणममधील सर्व भारतीयांनी सतर्क राहावे, आवश्यकता नसेल तर प्रवास करू नये, भारतीय दूतावासाच्या सोशल मीडियावरील पोस्टवर लक्ष ठेवावे आणि स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. 

टॅग्स :warयुद्धIranइराणIsraelइस्रायल