इसिसचा प्रमुख बगदादी ठार?

By Admin | Updated: June 15, 2016 05:15 IST2016-06-15T05:15:19+5:302016-06-15T05:15:19+5:30

इस्लामिक स्टेट अर्थात इसिस या दहशतवादी संघटनेचा प्रमुख अबू बकर अल बगदादी नाटोच्या हवाई हल्ल्यात ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. तथापि, अमेरिका किंवा इतर देशांकडून

ISIS chief Baghdadi killed? | इसिसचा प्रमुख बगदादी ठार?

इसिसचा प्रमुख बगदादी ठार?

वॉशिंग्टन : इस्लामिक स्टेट अर्थात इसिस या दहशतवादी संघटनेचा प्रमुख अबू बकर अल बगदादी नाटोच्या हवाई हल्ल्यात ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. तथापि, अमेरिका किंवा इतर देशांकडून याला दुजोरा मिळू शकला नाही. ओसामा बिन लादेननंतरचा जगातील सर्वांत क्रूर दहशतवादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अबू बकरवर १६० कोटी रुपयांचे बक्षीस आहे. नाटोने इसिसचा सीरियातील बालेकिल्ला असलेल्या रक्कामध्ये केलेल्या हल्ल्यात अबू मारला गेल्याचे या वृत्तात म्हटले आहे. अल अमाक्यू वृत्तसंस्थेनेही इसिसचा खलिफा बगदादी रविवारच्या हल्ल्यात ठार झाल्याचे म्हटले आहे.

Web Title: ISIS chief Baghdadi killed?