शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिका- इराण यांच्यातील युद्ध अटळ? मोबाईलवर आलेल्या 'त्या' मॅसेजमुळे नागरिकांना भरली धडकी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 08:53 IST

America Iran Conflict: अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव शिगेला पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर इराण येथील नागरिकांच्या मोबाईलवर एक अलर्ट मेसेज आला.

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव शिगेला पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर इराण येथील नागरिकांच्या मोबाईलवर एक अलर्ट मेसेज आला. त्यामुळे इराणमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. 'अमरिकेचे राष्ट्राध्यक्ष अलर्ट मोडवर आहेत, पहा काय घडतंय?' असा मेसेज एका अज्ञात मोबाईल क्रमांकावरून आला असला तरी ट्रम्प यांच्या मागील धमक्यांच्या पार्श्वभूमीवर इराणी नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. इराण इंटरनॅशनल न्यूज एजन्सीच्या दाव्यानुसार,  इराणवर संभाव्य लष्करी हल्ला होण्याचे संकेत मानले जात आहेत.

अमेरिकेने जगातील सर्वात शक्तिशाली अणु विमानवाहू जहाज, यूएसएस आर. गेराल्ड फोर्ड, इस्रायलजवळील समुद्रात तैनात करण्यात आले आहे. तेहरानच्या जवळ अमेरिकन सैन्याने युद्ध सामग्री गोळा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करण्याची योजना आखल्याचे दिसत आहे. युद्धजन्य परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, अमेरिकेने लेबनॉनमधील आपल्या दूतावासातील अनेक कर्मचाऱ्यांना तातडीने बाहेर काढले आहे. ही खबरदारीची पावले मोठ्या संघर्षाची नांदी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

येत्या गुरुवारी जिनेव्हा येथे इराण आणि अमेरिका यांच्यात अणु करारावर चर्चेची पुढील फेरी पार पडणार आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी सांगितले की, "राजनैतिक तोडगा निघू शकतो. मात्र, आम्ही कोणत्याही लष्करी दबावाला बळी पडणार नाही." दरम्यान, गुरुवारी होणारी ही चर्चा निष्फळ ठरली, तर ट्रम्प प्रशासन इराणविरोधात थेट लष्करी कारवाईचे पाऊल उचलण्याची दाट शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : US-Iran War Imminent? Message Sparks Fear Among Iranian Citizens

Web Summary : Tensions escalate between US and Iran. An alert message on Iranian phones sparked fear, hinting at a potential US military strike. The US deployed warships near Israel, raising war concerns. Talks are scheduled, but military action is possible if negotiations fail.
टॅग्स :warयुद्धAmericaअमेरिकाIranइराण