आम्ही युद्ध जिंकलो आहोत. आता फक्त उर्वरित मोहीम फत्ते करण्याचीच औपचारिकताच राहिलेली आहे, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून केला जात असतानाच इराणने तडाखा दिला. होर्मुझ सामुद्रधुनीला लागून असलेल्या पर्शियन गल्फमध्ये उभी असलेली दोन तेल जहाजे उडवली. यातील एक जहाज अमेरिकेचे, तर एक ग्रीकचे होते. या हल्ल्यात अमेरिकेच्या तेल जहाजावर असलेल्या भारतीयाचा मृत्यू झाला आहे.
पीटीआय वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, इराकजवळ असलेल्या अमेरिकेच्या मालकीचे तेल जहाज 'सेफ सी विष्णू'ला इराणने लक्ष्य केले. इराकच्या सागरी हद्दीत असलेल्या अल खोर अल जुबैर बंदरावर इराणच्या सुसाईड बोटीने हा हल्ला करण्यात आला.
एकाचा मृत्यू, २७ जणांना वाचवण्यात यश
या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, २७ जणांना वाचवण्यात यश आले आहे. चालक विभाग आणि इतर कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. त्यांना बसरा येथे नेण्यात आले आहे. इराणने हल्ला केलेले दुसरे तेल जहाज ग्रीकचे आहे.
सेफ सी विष्णू हे तेल जहाज अमेरिकास्थित सेफ सी ट्रान्सपोर्ट कंपनीचे आहे. तर झायफेरोस हे ग्रीकचे जहाज आङे. सेफ सीम संबंधित जवळच्या सूत्रांनी सांगितले की, या हल्ल्यात जहाजावरील क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला आहे. क्रू मेंबर भारतीय असून, कंपनीला धक्का बसला आहे.
व्हेसलफाईंडर मेरिटाईम ट्रॅकिंग साईटच्या माहितीनुसार, सेफसी विष्णू ही क्रूड ऑईल टँकर जहाजाची बांधणी २००७ मध्ये करण्यात आली होती. हे जहाज २२८.६ मिटर लांबी आणि ३२.५७ मिटर रुंद आहे.
Web Summary : Iran attacked two oil tankers near the Hormuz Strait, one American and one Greek. An Indian national on the American tanker, 'Safe Sea Vishnu,' died in the attack. 27 crew members were rescued from the incident near Iraq.
Web Summary : ईरान ने होर्मुज जलडमरूमध्य के पास दो तेल टैंकरों पर हमला किया, जिनमें से एक अमेरिकी और एक ग्रीक था। अमेरिकी टैंकर 'सेफ सी विष्णु' पर सवार एक भारतीय नागरिक की मौत हो गई। इराक के पास हुई घटना में 27 क्रू सदस्यों को बचाया गया।