शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेची साथ देणाऱ्या बहरीनवर इराणचा 'वार', सर्वात मोठ्या तेल रिफायनरीवर हवाई हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 16:21 IST

अमेरिका-इस्रायलने इराणविरोधात सुरू केलेल्या युद्धामुळे तेल आणि गॅसचा पुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. कारण तेल कंपन्या आणि तेल साठेही या युद्धापासून दूर राहिलेले नाहीत. 

इराणविरोधातअमेरिका-इस्रायलने सुरू केलेल्या युद्धाने मध्य पूर्व भागालाच संघर्षाच्या झळा बसू लागल्या आहेत. अमेरिकेचा लष्करी तळ असलेल्या शेजारी देशांवरही इराण हल्ले करत असून, आता बहरीनमधील सर्वात मोठ्या तेल रिफायनरीवरच हवाई हल्ला केला आहे. बापको ही बहरीनमधील सरकारी मालकीची कंपनी आहे, तिलाच लक्ष्य करण्यात आले आहे. 

इराणकडून हल्ला करण्यात आल्याचा उल्लेख कंपनीच्या निवेदनात केलेला नाही. पण, या हल्ल्यानंतर कंपनीने तेल शुद्धीकरण प्रकल्प बंद केला आहे. 

बापको आपल्या निवेदनात म्हटले आहे की, मध्य पूर्वेत सुरू काही दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्ष आणि त्यात रिफायनरीच्या परिसरात झालेल्या हल्ल्यामुळे कामावर परिणाम झाला आहे. अप्रत्यक्ष घडलेल्या घटनेमुळे काम काही काळासाठी बंद करत आहे. 

अप्रत्यक्ष घटना म्हणजे एक कायदेशीर नियम आहे, जो कंपनीला काम काही काळासाठी स्थगित करण्याची परवानगी देतो. जेव्हा कंपनीच्या नियंत्रणाबाहेर असलेली घटना घडते, त्यावेळी असे केले जाते. युद्ध, नैसर्गिक आपत्ती, सरकारी कारवाई किंवा इतर पुरवठा अखंडित होणे अशा घटनामुळे कंपनीच्या कार्यात अडथळा आल्यास काम स्थगित करता येते. 

एएफपी या वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, कतार आणि कुवेतमध्येही कंपन्यांनी अशा प्रकारे घोषणा केली होती. 

अरामकोवरही हल्ल्याचा प्रयत्न

सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, एम्प्टी क्वार्टरमध्ये शायबा तेल साठ्यांना लक्ष्य केले जात आहे. हल्ल्यासाठी पाठवण्यात आलेले ड्रोन्स आकाशात असतानाच पाडण्यात आली. अरामको या तेल कंपनीकडून हा प्रकल्प चालवला जातो. 

राजधानी रियाधच्या उत्तरेला दोन ड्रोन्स पाडण्यात आले, त्याचबरोबर उच्चायुक्तालये असलेल्या भागातही ड्रोन्स डागली गेली होती. पण, ती सुद्धा पाडण्यात आल्याचे संरक्षण विभागाने म्हटले आहे. 

संयुक्त अरब अमिरातीही इराणच्या हल्ल्यांपासून सुरक्षित राहिलेला नाही. फुजैराह भागात मोठी आग लागली होती. ही आग ड्रोन्समुळे लागली होती. ड्रोन्स आकाशात असताना निष्क्रिय करण्यात आला, मात्र त्या खाली पडल्यानंतर आगीचा भडका उडाला होता. 

युद्ध लांबले, तर अर्थव्यवस्था संकटात येईल

तीन देशात सुरू असलेले युद्ध वाढले तर अर्थव्यवस्थेवरील धोका वाढेल, अशी चिंता ब्रिटनचे पंतप्रधान किएर स्टार्मर यांनी व्यक्त केली आहे. 

'अमेरिका-इस्रायल आणि इराणचे युद्ध जितके दीर्घकाळ चालेल, तितका अर्थव्यवस्थांवरील संकट वाढेल. ब्रिटन दुसऱ्या देशांसोबत चर्चा करत आहे, जेणेकरून याची काळजी घेतली जाईल की युद्धामुळे बसणाऱ्या आर्थिक फटक्याचा परिणाम कसा कमी करता येईल', असे स्टार्मर म्हणाले. 

'लेबर सरकारने देशाला आर्थिक दृष्ट्‍या मजबूत करण्यासाठी काम केलं आहे. अर्थमंत्री रेचल रीव्ज दररोज बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरसोबत चर्चा करत आहेत. सरकार आंतरराष्ट्रीय सहकारी देशांसोबतही चर्चा करत आहे. जेणेकरून आम्ही सगळे मिळून हे सुनिश्चित करू शकू की, येथील लोकांवर आणि व्यापार याचा होणारा परिणाम कमी कसा करता येईल", असेही ते म्हणाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Iran 'Attacks' Bahrain Refinery Amidst US-Iran Tensions, Oil Plant Halts

Web Summary : Amid US-Iran tensions, Bahrain's major oil refinery, BAPCO, halts operations after an alleged Iranian attack. Saudi Arabia also reports drone attacks on oil facilities. The UK warns of economic risks if the conflict escalates, highlighting global concerns.
टॅग्स :IranइराणAmericaअमेरिकाWarयुद्धIsraelइस्रायल