इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका युद्धसंघर्षाने मध्य पूर्वेत अशांतता पसरली आहे. इस्रायल आणि अमेरिकेने सर्वोच्च नेता अयातुल्लाह अली खामेनेई यांना मारल्याने खवळलेल्या इराणने तीव्र प्रहार सुरू केला आहे. इराणने आजूबाजूच्या देशांमध्ये असलेल्या अमेरिकेच्या हवाई तळांना, हवाई करण्यासाठी आलेल्या लढाऊ विमानांनाही लक्ष्य केले आहे. अमेरिकेची काही एफ १५ लढाऊ विमान पडल्याचे व्हिडीओ समोर आले. कुवैतमध्ये हे विमाने पडली आहेत. कुवैतच्या संरक्षण मंत्रालयाने एक नव्हे, तर अनेक लढाऊ विमाने पाडली गेल्याचे म्हटले आहे.
कुवैतमध्ये अमेरिकेचे हवाई तळ आहे. या तळालाही इराणकडून लक्ष्य करण्यात आले आहे. हवाई हल्ला करण्यासाठी येणारी काही लढाऊ विमानेही इराणकडून पाडण्यात आली आहेत.
कुवैतमधील एक एफ १५ फायटर जेट कोसळतानाचा व्हिडीओ समोर आला. त्यानंतर इतरही काही व्हिडीओ व्हायरल झाले. याबद्दल कुवैतच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, रविवारी (१ मार्च) अनेक अमेरिकी लढाऊ विमान जमिनीवर कोसळली आहेत.
लढाऊ विमानांचे पायलट सुरक्षित आहेत. त्यांना रुग्णालयांमध्ये तपासणीसाठी नेण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. आम्ही सहकारी देश अमेरिकेसोबत या घटनांबद्दल बोलत आहोत आणि या घटनांचा तपासही केला जात आहे.
कुवैतमधील अमेरिकेतली दूतावासाजवळ मोठा स्फोट
कुवैतमध्ये असलेल्या अमेरिकेच्या दूतावासाजवळ मोठा स्फोट होऊन धुराचे लोट आकाशात उडताना दिसले. हा हल्ला असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. या घटनेनंतर अमेरिकन दूतावासाने कुवैतमधील आपल्या नागरिकांना आपापल्या घरात सुरक्षित राहण्यास सांगितले आहे.
"दूतावासात येऊ नये. आपण आपल्या घराच्या सर्वात खालच्या मजल्यावर राहावे आणि खिडक्यांपासून दूर आणि बाहेर पडू नये. हल्ला होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सावध रहावे आणि सुरक्षित राहण्यासंदर्भात उपाययोजना कराव्यात", अमेरिकेच्या कुवैतमधील दूतावासाने अमेरिकन नागरिकांना आवाहन केले आहे.
Web Summary : Amidst rising tensions, Iran targeted US airbases and aircraft near Kuwait. Videos surfaced of downed F-15s. Kuwait confirmed multiple US fighter jets crashed on March 1st. Pilots are safe and under medical observation. The US embassy in Kuwait reported an explosion near the embassy.
Web Summary : ईरान ने कुवैत के पास अमेरिकी हवाई अड्डों और विमानों को निशाना बनाया। एफ-15 विमानों के गिरने के वीडियो सामने आए। कुवैत ने 1 मार्च को कई अमेरिकी लड़ाकू विमानों के दुर्घटनाग्रस्त होने की पुष्टि की। पायलट सुरक्षित हैं। कुवैत में अमेरिकी दूतावास के पास विस्फोट की खबर है।