मध्य-पूर्वेतील युद्धात आता दावे-प्रतिदाव्यांचे रणकंदन सुरू झाले आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने असा खळबळजनक दावा केला आहे की, त्यांनी अमेरिकेचे २ 'C-130' ट्रान्सपोर्ट विमान आणि २ 'ब्लॅक हॉक' हेलिकॉप्टर्स उद्ध्वस्त केली आहेत. इराणच्या मते, अमेरिकेचे हे रेस्क्यू मिशन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वैमानिकाला सुखरूप वाचवल्याचे सांगत इराणचा दावा फेटाळून लावला आहे.
इराणच्या तस्नीम न्यूज एजन्सीनुसार, इस्फहानच्या दक्षिण भागात अमेरिकन लष्कर आपल्या कोसळलेल्या विमानातील वैमानिकाला वाचवण्यासाठी मोठी मोहीम राबवत होते. याच वेळी इराणच्या हवाई संरक्षण दलाने एकात्मिक हल्ला करून अमेरिकेची २ मोठी विमाने आणि दोन हेलिकॉप्टर पाडली. इराणने काही व्हिडिओ आणि मलब्याचे फोटो जारी करून ट्रम्प आपली हार लपवत असल्याचा आरोप केला आहे.
ट्रम्प यांचा दावा: "पायलट धोक्याबाहेर"दुसरीकडे, व्हाईट हाऊसमधून माहिती देताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, "आमच्या शूर सैनिकांनी डझनभर सशस्त्र विमानांच्या मदतीने शत्रूच्या हद्दीतून वैमानिकाला यशस्वीरित्या बाहेर काढले आहे. वैमानिक जखमी आहे, मात्र तो आता धोक्याबाहेर आणि सुरक्षित आहे." ट्रम्प यांनी या मोहिमेला मोठे यश म्हटले असून इराणच्या दाव्यांना 'खोटा प्रचार' ठरवले आहे.
४ विमाने की १? संभ्रम कायमसुरुवातीला इराणने केवळ एक विमान पाडल्याचे म्हटले होते, मात्र आता IRGC ने ही संख्या चारवर नेली आहे. अमेरिकेने अद्याप अधिकृतपणे ४ विमाने गमावल्याची पुष्टी केलेली नाही. स्वतंत्र सूत्रांकडून या मलब्याची पडताळणी होऊ शकलेली नाही, मात्र या घटनेमुळे दोन्ही देशांमधील तणाव आता सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे.
Web Summary : Iran claims to have downed four US aircraft during a rescue mission, a claim President Trump denies. Trump asserts the pilot was rescued safely, dismissing Iran's account as false propaganda amidst rising tensions.
Web Summary : ईरान ने बचाव अभियान के दौरान अमेरिका के चार विमानों को मार गिराने का दावा किया है, जिसका राष्ट्रपति ट्रम्प ने खंडन किया है। ट्रम्प का कहना है कि पायलट को सुरक्षित बचाया गया, और ईरान का दावा झूठा है। तनाव बढ़ रहा है।