पश्चिम आशियातील तणाव आता टोकाला पोहोचला आहे. अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या लष्करी कारवाईला उत्तर म्हणून इराणने चौथ्या दिवशीही जोरदार हल्ले केले आहेत. इराणने डागलेल्या क्षेपणास्त्रांमुळे दुबई, दोहा आणि अबु धाबी ही शहरे स्फोटांनी हादरली आहेत. दुसरीकडे, इराणमधील एका शाळेवर झालेल्या हल्ल्यात मृतांची संख्या वाढून ७८७ वर पोहोचली असून, यामुळे जगातून संताप व्यक्त केला जात आहे.
इराणने आता आपला मोर्चा अशा देशांकडे वळवला आहे जे आतापर्यंत तटस्थ राहण्याचा प्रयत्न करत होते. दुबई आणि अबु धाबीमधील लष्करी तळांच्या दिशेने ही क्षेपणास्त्रे डागण्यात आल्याचे समजते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्यांवर आश्चर्य व्यक्त केले आहे. ते म्हणाले, "ज्या देशांना इराणने लक्ष्य केले आहे, त्यांचे इराणशी संबंध पूर्वी मध्यम स्वरूपाचे होते. हे हल्ले अनपेक्षित आहेत." तसेच, अडकलेल्या अमेरिकन नागरिकांना बाहेर काढण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही, कारण ही मोहीम अत्यंत वेगाने पुढे सरकली, अशी कबुलीही त्यांनी दिली.संयुक्त अरब अमिरातीची आर्थिक राजधानी असलेल्या दुबईमध्ये अमेरिकन दूतावासाच्या परिसरात लागलेली आग पूर्णपणे विझवण्यात यश आले आहे. दुबईतील अमेरिकन दुतावासावर इराणने ड्रोनने हल्ला केला होता. त्यापूर्वी जेद्दाहमधील अमेरिकी दुतावासाला लक्ष्य करण्यात आले होते.
दीर्घकालीन युद्धाची तयारीअमेरिकेने स्पष्ट केले आहे की, वॉशिंग्टन आता एका मोठ्या आणि दीर्घकालीन लष्करी अभियानासाठी सज्ज आहे. इराणकडे 'हजारो क्षेपणास्त्रे' असून त्यातील काही नष्ट केली असली तरी धोका अद्याप कायम असल्याचे ट्रम्प यांनी नमूद केले.
होर्मुझची नाकेबंदीइराणने आधीच 'होर्मुझ सामुद्रधुनी' बंद करण्याची घोषणा केली असून, या मार्गावरून जाणाऱ्या कोणत्याही जहाजाला 'आग लावून' नष्ट करण्याची धमकी दिली आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर सध्या इंधनाचे दर गगनाला भिडले असले तरी, लष्करी कारवाई संपल्यानंतर बाजारात स्थिरता येईल, असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे.
Web Summary : Iran retaliated with missile strikes on Dubai, Doha, and Abu Dhabi, causing numerous casualties. Trump issued a warning as tensions escalate after attacks, and the threat of prolonged conflict looms with potential disruption to global shipping routes.
Web Summary : ईरान ने दुबई, दोहा और अबू धाबी पर मिसाइल हमले किए, जिससे कई लोगों की मौत हो गई। हमलों के बाद तनाव बढ़ने के साथ ही ट्रम्प ने चेतावनी जारी की, और वैश्विक शिपिंग मार्गों में संभावित व्यवधान के साथ लंबे समय तक संघर्ष का खतरा मंडरा रहा है।