शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेच्या मिसाईल हल्ल्यात इराणचा मेजर जनरल सुलेमानी ठार; बगदादच्या विमानतळावर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 09:54 IST

बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी (3 जानेवारी) रॉकेट हल्ला झाला आहे. तीन रॉकेटचा हल्ला करण्यात आल्याने या ठिकाणी वाहनांना आग लागली. अनेक सैनिक जखमी झाले आहेत.

बगदाद : इराकची राजधानी बगदादच्या विमानतळावर अमेरिकेने हवाई हल्ला करून इराणच्या एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याला ठार केले आहे. मेजर जनरल कासिम सुलेमानी असे या अधिकाऱ्य़ाचे नाव असून इराणच्या कद्स फोर्सचे ते प्रमुख होते. सुलेमानी यांच्या वाहनांचा ताफा बगदाद विमानतळाकडे जात असताना अमेरिकेने हा हल्ला केला. यामध्ये इराणच्या पॉप्‍युलर मोबीलायझेशन फोर्सचे डेप्‍युटी कमांडर अबू मेहदी अल मुहांदिस यांचाही मृत्यू झाल्याचे समजते. 

बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी (3 जानेवारी) रॉकेट हल्ला झाला आहे. तीन रॉकेटचा हल्ला करण्यात आल्याने या ठिकाणी वाहनांना आग लागली. अनेक सैनिक जखमी झाले आहेत. बगदादमध्ये अमेरिकेच्या दूतावासावर इराण समर्थक मिलिशियाकडून नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला हल्ला करण्यात आला होता. अमेरिकेसोबत तणाव निर्माण झाल्यानंतर हा हल्ला करण्यात आला होता.

इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीने सुलेमानी यांच्या मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. सुलेमानी यांना पश्चिम आशियातील इराणच्या कारवायांचे प्रमुख रणनीतिकार म्हटले जात होते. सुलेमानी यांच्यावर सिरियामध्ये पाय रोवणे आणि इस्त्रायलवर रॉकेट हल्ला करण्याचा आरोप होता. अमेरिकाही सुलेमानीच्या मागावर होती.पेटॅगॉननेही या हल्ल्याच्या वृत्ताला होकार दिला आहे. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार अमेरिकेच्या सैन्याने सुलेमानीला ठार केल्याचे म्हटले आहे. 

तर डोनाल्ड ट्रम्प य़ांनी फक्त अमेरिकेचा झेंडा ट्विटरवर पोस्ट केला आहे. यामध्ये कोणताही संदेश लिहिण्यात आलेला नाही. या हल्ल्यामुळे पश्चिम आशियामध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे. सुलेमानी हा इस्लामिक रिव्होल्यूशनरी सेनेच्या एका ताकदवान विंग 'कदस फोर्स'चा प्रमुख होता. अल महांदिस एका सशस्त्र सैनिकांच्या गराड्यात सुलेमानीला घेण्यासाठी विमानतळावर पोहोचले होते. सुलेमानीचे विमान सिरिय़ा किंवा लेबनॉनहून बगदादला पोहोचले होते. सुलेमानी जसे विमानातून उतरले तेव्हाच अमेरिकेने मिसाईल डागले. सुलेमानीचा मृतदेह त्याच्या अंगठीवरून ओळखण्यात आला आहे.

टॅग्स :IranइराणAmericaअमेरिकाAfghanistanअफगाणिस्तान