शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

इराणचा आतापर्यंतचा सर्वाधिक लांबपल्ल्याचा हल्ला! हिंदी महासागरातील अमेरिकन तळावर 'लॉन्ग रेंज' मिसाईल डागल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 07:51 IST

Iran War: इराणचा हिंद महासागरातील अमेरिकेच्या 'डिएगो गार्सिया' तळावर भीषण मिसाईल हल्ला! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'मिशन इराण'बाबत मोठे विधान. वाचा सविस्तर अपडेट्स.

मध्य पूर्वेतील युद्धाची धग आता थेट हिंदी महासागरापर्यंत पोहोचली आहे. इराणने शनिवारी अमेरिकेचा सर्वात सुरक्षित समजला जाणारा लष्करी तळ 'डिएगो गार्सिया'वर बॅलिस्टिक मिसाईल्स डागून जगाला हादरवून सोडले आहे. 'वॉल स्ट्रीट जर्नल'ने दिलेल्या वृत्तानुसार, इराणचा हा आतापर्यंतचा सर्वात लांब पल्ल्याचा आणि दुर्मिळ हल्ला मानला जात आहे.

हिंदी महासागरात स्थित असलेल्या अमेरिका आणि ब्रिटनच्या संयुक्त लष्करी तळावर इराणने दोन मध्यम पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदैवाने ही दोन्ही क्षेपणास्त्रे लक्ष्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच निकामी ठरली. मात्र, इराणने आपल्या सीमा ओलांडून इतक्या दूरवर हल्ला केल्याने अमेरिकेच्या संरक्षण यंत्रणेची झोप उडाली आहे.

या भीषण तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल'वर एक पोस्ट करत खळबळ उडवून दिली आहे. ट्रम्प म्हणाले की, "अमेरिका मध्य पूर्वेतील आपली लष्करी उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या अगदी जवळ आहे. आता आम्ही लष्करी मोहिमा 'समाप्तीकडे' नेण्याचा विचार करत आहोत." विशेष म्हणजे, ट्रम्प यांनी हे स्पष्ट केले की हा 'सीजफायर' (युद्धविराम) नाही, तर आपली रणनीती बदलण्याची वेळ आली आहे.

इस्रायलमध्ये मिसाईल्सचा पाऊस; तेल अवीव हादरलेएकीकडे हिंद महासागरात हल्ला झाला असतानाच, दुसरीकडे इराणने इस्रायलवरही आक्रमक पवित्रा घेतला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा तेल अवीव आणि वेस्ट बँक परिसरात इराणने डझनभर क्षेपणास्त्रे डागली. संपूर्ण इस्रायलमध्ये सायरनचे आवाज घुमत होते आणि भीतीचे वातावरण पसरले होते.

UAE ला थेट इशारा: युद्धाचा विस्तार होणार?इराणने आता संयुक्त अरब अमिरातीला सुद्धा लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. इराणच्या मते, यूएई आपल्या भूमीचा वापर इराणच्या बेटांवर हल्ले करण्यासाठी अमेरिकेला करू देत आहे. त्यामुळे रास अल खैमाह या शहरावर थेट हल्ला करण्याचा इशारा तेहरानने दिला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran's Longest-Range Attack: Missiles Target US Base in Indian Ocean

Web Summary : Iran launched ballistic missiles at a US base in the Indian Ocean, escalating Middle East tensions. Missiles also hit Israel. Iran threatened UAE, raising fears of wider conflict, even as Trump hinted at strategy shift.
टॅग्स :IranइराणUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरWarयुद्धAmericaअमेरिका