इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे 'होर्मुजची सामुद्रधुनी' सध्या जगातील सर्वात धोकादायक सागरी मार्ग बनला आहे. इराणकडून होणारे ड्रोन आणि मिसाईल हल्ले टाळण्यासाठी आता व्यापारी कंपन्यांना चक्क 'खंडणी' द्यावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका मोठ्या तेल कंपनीने आपल्या जहाजाच्या सुरक्षित प्रवासासाठी इराणला २० लाख डॉलर्स (सुमारे १६.५ कोटी रुपये) दिल्याचे उघड झाले आहे.
होर्मुज सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जहाजांवर इराणकडून सातत्याने हल्ले होत आहेत. यामुळे अनेक जहाजे अडकून पडली असून कोट्यवधींचे नुकसान होत आहे. हे टाळण्यासाठी संबंधित तेल कंपनीने इराणच्या मध्यस्थांशी संपर्क साधून ही मोठी रक्कम मोजली आहे. या बदल्यात इराणने त्या कंपनीच्या जहाजाला कोणताही अडथळा न आणता सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते.
आंतरराष्ट्रीय व्यापार क्षेत्रात खळबळया घटनेमुळे आंतरराष्ट्रीय सागरी व्यापार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. जर अशा प्रकारे खंडणी देऊन जहाजे सोडवली जाऊ लागली, तर इराणकडून अशा कृत्यांना अधिक प्रोत्साहन मिळेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
इराणची नवी रणनीती: ताबा आणि व्यापारशिपिंग अधिकाऱ्यांच्या मते, इराण या जलमार्गावर स्वतःचे नियंत्रण सिद्ध करू पाहत आहे. समुद्री ट्रॅकिंग डेटावरून असे समोर आले आहे की, भारत, पाकिस्तान आणि ग्रीसची काही जहाजे इराणच्या 'लराक आयलंड' जवळून असामान्य मार्गाने पुढे जात आहेत. विशेष म्हणजे, चीनची ९ जहाजे सध्या अबुधाबीच्या उत्तरेला थांबलेली असून, ती इराणच्या मदतीने हा मार्ग पार करण्याच्या तयारीत आहेत.
Web Summary : Amidst US-Iran tensions, companies are paying Iran for safe passage through the Hormuz Strait. A major oil firm paid $2 million to avoid attacks. This incident has sparked alarm in international trade, raising fears of incentivizing further extortion by Iran.
Web Summary : अमेरिका-ईरान तनाव के बीच, कंपनियां होर्मुज़ जलडमरूमध्य से सुरक्षित मार्ग के लिए ईरान को भुगतान कर रही हैं। एक बड़ी तेल कंपनी ने हमलों से बचने के लिए 2 मिलियन डॉलर का भुगतान किया। इस घटना ने अंतर्राष्ट्रीय व्यापार में खतरे की घंटी बजा दी है, जिससे ईरान द्वारा और अधिक जबरन वसूली को प्रोत्साहन मिलने का डर है।