शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
6
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
7
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
8
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
9
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
10
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
11
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
12
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
13
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
14
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
15
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
16
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
17
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
18
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
19
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
20
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ

इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 18:22 IST

इराणने संयुक्त राष्ट्रसंघाच्या अणुऊर्जा तपासणी करणाऱ्या संस्थेशी (IAEA) आता संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे.

इराणने संयुक्त राष्ट्रसंघाच्या अणुऊर्जा तपासणी करणाऱ्या संस्थेशी (IAEA) आता संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. इराणच्या संसदेने बुधवारी (आज) याबाबतचे एक विधेयक मंजूर केले आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेने 'नूरन्यूज'च्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

युद्धानंतरचा महत्त्वाचा निर्णयइराणचा हा निर्णय अशा वेळी आला आहे, जेव्हा इस्रायलसोबतचे त्यांचे युद्ध १२ दिवसांनी संपुष्टात आले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी होण्यासाठी इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची अंतिम मंजुरी अजून बाकी आहे.

इराणच्या 'तस्नीम' वृत्तसंस्थेने सोमवारी (२२ जून २०२५) सांगितले होते की, या नवीन नियमांनुसार, इराणच्या अणु-केंद्रांच्या सुरक्षिततेची खात्री मिळेपर्यंत तिथे कॅमेरे लावणे, तपासणीला परवानगी देणे आणि IAEA ला अहवाल देणे हे सर्व थांबवले जाईल. मात्र, यासाठी अजून संसदेच्या पूर्ण सत्रात या विधेयकाला अंतिम मंजुरी मिळणे आवश्यक आहे.

इराणकडे अजूनही अणुबॉम्ब बनवण्याइतकं साहित्य?अलीकडेच इस्रायल-इराण संघर्षादरम्यान अमेरिकेने इराणच्या इस्फान, फोर्डो आणि नतांज या तीन मोठ्या अणु-ठिकाणांवर हल्ला केला होता. अमेरिकेने दावा केला होता की, या हल्ल्यामुळे इराणचे अणुबॉम्ब बनवण्याचे स्वप्न उद्ध्वस्त झाले आहे. पण इराणने हा दावा फेटाळून लावला. अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी असेही म्हटले आहे की, इराणकडे अजूनही इतके साहित्य शिल्लक आहे की ते ९ अणुबॉम्ब बनवू शकतात.

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलwarयुद्धnuclear warअणुयुद्ध