जवळपास महिना लोटत आला तरी अमेरिका आणि इस्राइलने इराणविरोधात सुरू केलेलं युद्ध संपताना दिसत नाही आहे. त्यातच आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राला संबोधित करताना युद्ध थांबवण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. त्यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष अधिकच वाढण्याची चिन्हे दिसत असून, आखातामधील तणावामुळे संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान यांनी अमेरिकन नागरिकांना उद्देशून लिहिलेल्या पत्रामधून युद्ध थांबवण्याचा एक सकारात्मक फॉर्म्युला समोर आला आहे. या पत्रामधून एकीकडे युद्धाबाबत आव्हानाची भाषा असली तरी दुसरीकडे त्यामधून शांततेचं आवाहनही केलेलं दिसत आहे. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांचा अहंकार हा या फॉर्म्युल्याच्या मार्गातील मोठा अडथळा ठरू शकतो. पण यामध्ये डोनाल्ड ट्रम्प याच्या अहंकारावरील उपायही सूचवण्यात आला आहे.
या पत्रामध्ये पेजेश्कियान यांनी स्पष्टपणे लिहिले की, इराणचं अमेरिकन जनतेशी कुठल्याही प्रकारचं शत्रुत्व नाही आहे. माझं हे संबोधन अमेरिकेतील त्या नागरिकांसाठी आहे जे दिशाभूल करणारे दावे आणि कपोलकल्पित गोष्टींच्या महापुरामध्येही सत्याचा शोध घेत आहेत. तसेच एका चांगल्या जीवनाची आशा बाळगून आहेत. इराणच्या मनात इतर देशांबद्दल कुठलंही शत्रुत्व नाही आहे. यात अमेरिका, इराण आणि शेजारील देशातील नागरिकांचा समावेश आहे. इराण एक असा देश आहे, ज्याने किमान अमेरिकेच्या स्थापनेपासून आतापर्यंत कधीही कुठल्याही युद्धाची सुरुवात केलेली नाही.
या पत्रामधून पेजेश्कियान यांनी डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेचा अहंकार कुरवाळण्याचाही पुरेपूर प्रयत्न केला आहे. त्यात ते लिहितात की, इराणने चर्चा सुरू ठेवली होती. यादरम्यान, एक करारही केला आणि दिलेली सर्व वचनंही पूर्ण केली. त्या करारापासून माघार घेणं, तणाव आणि चर्चेच्या फेऱ्या सुरू असताना दोन वेळा आक्रमकता दाखवण्याचा निर्णय घेणे ही अमेरिकन सरकारकडून करण्यात आलेली विध्वंसक निवड होती, असा टोलाही पेडेश्कियान यांनी लगावला.
या पत्रामध्ये पेजेश्कियान यांनी शेवटी लिहिले की, मी तुम्हाला निमंत्रित करतो. तुम्ही चुकीची माहिती पसरवणाऱ्या आक्रमकतेचं अतूट अंग असलेल्या त्या मशिनरींच्या बाहेर डोकावून पाहा. त्याऐवजी ज्यांनी इराणचा दौरा केलेला आहे. यशस्वी इराणी व्यक्ती ज्या इराणमध्ये शिकून आता जगातील सर्वात प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये शिकवत आहेत. तसेच पाश्चात्य टेक कंपन्यांमध्ये आपलं योगदान देत आहेत, अशा व्यक्तींना भेटा आणि वास्तव आणि कपोलकल्पित कहाण्या यांचा काही मेळ बसतो का याचा आढावा घ्या.
Web Summary : Iran's president proposes a formula to end conflict with the US in a letter to American citizens, emphasizing peace, but acknowledges Trump's potential obstruction. He invites Americans to see Iran firsthand and question narratives.
Web Summary : ईरान के राष्ट्रपति ने अमेरिकी नागरिकों को पत्र लिखकर संघर्ष खत्म करने का फार्मूला पेश किया, शांति पर जोर दिया, लेकिन ट्रम्प की बाधाओं को स्वीकार किया। उन्होंने अमेरिकियों को ईरान देखने और दावों पर सवाल उठाने के लिए आमंत्रित किया।