शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

इराणी नौदलाचे मुख्यालय उद्ध्वस्त, ९ युद्धनौकाही बुडवल्या! डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा; ४ आठवड्यांत इराण गुडघे टेकणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 02:59 IST

9 Iranian naval ships sunk: डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्धच्या युद्धात मोठ्या विजयाचा दावा केला आहे. अमेरिकन लष्कराने इराणच्या ९ युद्धनौका बुडवल्या असून नौदल मुख्यालय नष्ट केले आहे. १,००० हून अधिक तळांवर हल्ले झाल्याने इराण खिळखिळा झाला आहे.

वॉशिंग्टन/तेहरान: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्धच्यायुद्धात अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून, इराणी नौदलाचा मोठा विनाश केल्याचा दावा केला आहे. ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल'वर माहिती दिली की, अमेरिकन लष्कराने इराणचे नौदल मुख्यालय जवळपास पूर्णपणे उद्ध्वस्त केले असून ९ युद्धनौका समुद्रात बुडवल्या आहेत.

"मला नुकतीच माहिती मिळाली आहे की आम्ही इराणच्या ९ युद्धनौका नष्ट केल्या आहेत. त्यापैकी काही मोठ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या होत्या. आम्ही आता उरलेल्या जहाजांच्या दिशेने सरकत आहोत, ती देखील लवकरच समुद्रात तळाला दिसतील!" असे ट्रम्प यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

मुख्यालय उद्ध्वस्त: एका मोठ्या हवाई हल्ल्यात इराणच्या नौदल मुख्यालयाचा अमेरिकेने धुव्वा उडवला आहे.

४ आठवड्यांचे टार्गेट'डेली मेल'ला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी संकेत दिले की, इराणविरुद्धचा हा संघर्ष पुढील ४ आठवड्यांत संपुष्टात येईल. "इराण हा मोठा देश असला तरी, आमचा अंदाज आहे की ही प्रक्रिया चार आठवडे किंवा त्यापेक्षा कमी वेळात पूर्ण होईल," असे त्यांनी स्पष्ट केले.

१,००० हून अधिक ठिकाणांवर हल्लेयूएस सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येच्या मोहिमेपासून आतापर्यंत अमेरिकन लष्कराने इराणमधील १,००० हून अधिक लष्करी तळांवर भीषण बॉम्बफेक केली आहे. यामध्ये क्षेपणास्त्र केंद्रे, एअर डिफेन्स सिस्टिम आणि कमांड सेंटर्सचा समावेश आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Trump claims destruction of Iranian Navy HQ, warships; Iran to surrender?

Web Summary : Donald Trump claims US forces decimated Iran's naval headquarters and sunk nine warships. He anticipates Iran will capitulate within four weeks, following extensive attacks on over 1,000 Iranian military sites, including missile centers and command posts.
टॅग्स :IranइराणDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाwarयुद्ध