शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

संचलनात क्षेपणास्त्रांच्या जागी मोबाईल दवाखाने; इराणचा सैन्यदिन अनोख्या पद्धतीने

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 05:12 IST

इराणच्या सैन्यानं संचलन केलं, पण सैन्य एकटं नव्हतं. ना संचलनात क्षेपणास्त्रं होती ना बंदुका, ना विमानं. रस्त्यावर तोंडाला मास्क बांधून नीडर जवान बाहेर पडले होते. त्यांच्या हातात वैद्यकीय उपकरणं होती.

इतिहासात नोंद होतेय, पुढच्या पिढ्या आपलं उदाहरण देऊन सांगणार आहेत की, एक काळ असाही होता मानवी इतिहासात की, ‘दुनियेच्या तमाम देशांकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रं होती, काहींकडे तर आण्विक अस्त्रं बनविण्याची क्षमता होती. मात्र, त्यांच्याकडे व्हेंटिलेटर्स नव्हती. माणसं मरत होती, तर दवाखान्यात पलंग नव्हते, डॉक्टरांना सुरक्षा साधनं नव्हती. त्यांची सारी हत्यारंच फोल ठरली होती!’एरवी हे फॉरवर्ड वाक्य विनोद म्हणून सोडून देता आलं असतं, पण आज ती वस्तुस्थिती आहे. वास्तव आहे ते चालू वर्तमानकाळाचं. ते किती बोचरं असावं याचं चित्र शुक्रवारी इराणमध्ये दिसलं.१७ एप्रिल हा इराणचा राष्ट्रीय सैन्यदिन. एरवी सैन्यदिन म्हटल्यावर परेड अर्थात संचलन होतंच. आपल्या देशाची संरक्षण सज्जता दाखवली जाते. डोक्यावर फायटर प्लेन भिरभिरतात. ते कसरती करतात. आधुनिक हेलिकॉप्टर्स, तोफा, बंदुका, क्षेपणास्त्रं, पाणडुबी, बंदुका या साऱ्याचं प्रदर्शन केलं जातं. आपल्या देशाची ताकद दाखवून देशवासीयांना सांगितलं जातं की, घाबरू नका आपला देश संरक्षण सिद्ध आहे. मात्र, १७ एप्रिल २०२० हा देश मानवी इतिहासात वेगळा म्हणून नोंदवला जाईल. इराणच्या सैन्यानं संचलन केलं, पण सैन्य एकटं नव्हतं. ना संचलनात क्षेपणास्त्रं होती ना बंदुका, ना विमानं. रस्त्यावर तोंडाला मास्क बांधून नीडर जवान बाहेर पडले होते. त्यांच्या हातात वैद्यकीय उपकरणं होती.सोबत मोबाईल दवाखाने होते, डिसइन्फेशक्न व्हेईकल्स होती. कोरोनाच्या महामारीने साºया इराणलाच पोखरलं असताना सैन्य देशवासीयांना सांगत होतं की, आम्ही तुमच्या मदतीला उतरलो आहोत, पण यावेळी जगवणारी साधनं वेगळी आहेत. बंदुका, तोफांचा काही उपयोग नाही, आम्ही वेगळी शस्त्रं घेऊन लढतोय. ‘डिफेंडर्स ऑफ द होमलँड, हेल्पर्स ऑफ द हेल्थ.’ असं या परेडचं नाव होतं. छोटेखानी परेड झाली. ट्रेनिंग सेंटरपुरती मर्यादित होती. कमांडर चेहºयाला मास्क लावून शिस्तीत संचलन करत होते. ही लढाई इराण जिंकणार का? तर जिंकणार असं सांगत असताना अध्यक्ष हसन रुहानी सांगतात, ‘हे संचलन वेगळं आहे. शत्रू दिसत नाही, सैन्याचं काम डॉक्टर्स आणि परिचारिका करत आहेत.’खरंच इराणची लढाई मोठी आहे. तेथे बाधितांचा आकडा (ही बातमी लिहीत असताना) ८०,८६८ आहे. ५,०३१ लोक मृत्युमुखी पडले आहेत. कोरोनाशी लढून देश वाचवण्याचं मोठं आव्हान आज इराणचे सैनिक, त्यात डॉक्टर, परिचारिकाही पेलत आहेत, झुंजत आहेत नव्या शस्त्रांनिशी..

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याIranइराण