गेल्या सव्वा महिन्यापासून अमेरिकेने इराणविरोधात सुरू केलेल्या युद्धात गेल्या २४ तासांमध्ये जबरदस्त उलथापालथ दिसून आली आहे. गेल्या २४ तासांमध्ये इराणने अमेरिकेची दोन लढाऊ विमाने पाडली आहेत. तर बचाव मोहिमेदरम्यान, दोन ब्लॅक हॉक विमानांना लक्ष्य करण्यात आलं आहे. एवढंच नाही तर अमेरिकेचा एक पायलटही बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे.
इराणमधील मोहिमेदरम्यान, अमेरिकेला झालेल्या नुकसानीची माहिती देताना इराणी प्रसारमाध्यमांनी काही फोटो प्रसिद्ध केले आहे. तसेच कुवेत येथील कॅम्प बुहरिंग येथे इराणने केलेल्या हल्ल्यात अमेरिकन सैन्याचं एक बोईंग सीएच-४७ चिनूक हे बलाढ्य हेलिकॉप्टर उद्ध्वस्त झाल्याचा दावा केला आहे.
२८ फेब्रुवारीला सुरू झालेल्या युद्धात आतापर्यंत अमेरिकेने इराणवर हवाई वर्चस्व राखल्याचा दावा केला होता. मात्र गेल्या २४ तासांत इराणने दिलेल्या प्रत्युत्तरामुळे अमेरिकेच्या दाव्याला मोठं आव्हान मिळालं आहे. अधिक माहितीनुसार अमेरिकेचं एक एफ-१५ई हे लढाऊ विमान इराणमध्ये हल्ला करत असताना कोसळलं होतं. त्यात दोन पायलट होते. त्यातील एकाला वाचवण्यात आलं आहे. तर दुसरा बेपत्ता आहे. तो इराणमध्ये लपून असल्याची शक्यता आहे. तसेच इराणने या पायलटाची माहिती देणाऱ्याला बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. या विमानातील बेपत्ता पायलटला शोधण्यासाठी निघालेल्या दोन एचएच-६०डब्ल्यू जॉली ग्रीन II ही हेलिकॉप्टर इराणी गोळीबाराच्या तडाख्यात सापडली. यात काही सैनिक जथमी झाले. याशिवाय इराणने दोन ए-१० वारथॉग विमानांना लक्ष्य केले. त्यातीस एक विमान पर्शियन आखातात कोसळलं. तर दुसऱ्या विमानाने इंजिन खराब झालं असतानाही यशस्वीरीत्या उतरण्यात यश मिळवलं.
Web Summary : Iran claims to have downed two US fighter planes and two helicopters in the last 24 hours. One US pilot is reportedly missing. Iran also claims to have destroyed a Chinook helicopter at a Kuwait base, marking a significant blow to US air dominance.
Web Summary : ईरान ने दावा किया है कि उसने पिछले 24 घंटों में दो अमेरिकी लड़ाकू विमानों और दो हेलीकॉप्टरों को मार गिराया है। एक अमेरिकी पायलट लापता बताया जा रहा है। ईरान ने कुवैत के एक बेस पर चिनूक हेलीकॉप्टर को नष्ट करने का भी दावा किया, जो अमेरिकी हवाई वर्चस्व के लिए एक महत्वपूर्ण झटका है।