मध्य पूर्वेतील तणाव आता टोकाला पोहोचला असून इराण आणि अमेरिका यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला 'होरमुझची सामुद्रधुनी' उघडण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम दिला होता. मात्र, इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने ट्रम्प यांना त्यांच्याच शैलीत उत्तर देत त्यांची खिल्ली उडवली आहे.
'तुम्हाला नोकरीवरून काढून टाकले आहे!'इराणने ट्रम्प यांचा अपमान करताना त्यांच्या प्रसिद्ध टीव्ही शो 'द अप्रेंटिस'मधील "यू आर फायर्ड" (You're Fired - तुम्हाला नोकरीवरून काढून टाकले आहे) या गाजलेल्या वाक्याचा वापर केला. "तुम्ही आम्हाला काय सांगता, तुम्हालाच नोकरीवरून काढून टाकले आहे," अशा शब्दांत इराणने ट्रम्प यांना डिवचले आहे.
काय होता ट्रम्प यांचा इशारा?ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली होती की, जर ४८ तासांत सागरी मार्ग मोकळा केला नाही, तर अमेरिका इराणच्या वीज प्रकल्पांवर बॉम्बफेक करेल. याला उत्तर देताना इराणचे लष्करी प्रवक्ते इब्राहिम झोलफकारी म्हणाले, "जर आमच्या ऊर्जा केंद्रांवर हल्ला झाला, तर आम्ही अमेरिकेशी संबंधित जगातील कोणत्याही तळाला सोडणार नाही."
इराणमध्ये अमेरिकेविरोधात संतापाची लाटइराणमधील कर्मन, दक्षिण खोरासान, उर्मिया आणि अर्दबिल यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये अमेरिकेविरोधात प्रचंड निदर्शने सुरू आहेत. 'फार्स न्यूज एजन्सी'ने दिलेल्या माहितीनुसार, हजारो नागरिक रस्त्यावर उतरून अमेरिका आणि इस्रायलविरोधी घोषणाबाजी करत आहेत. यावेळी आंदोलकांच्या हातात नवे सर्वोच्च नेते मुजतबा खामेनेई यांचे फोटो पाहायला मिळाले.
Web Summary : Iran dismissed Trump's ultimatum regarding the Hormuz Strait, using his famous catchphrase 'You're Fired!'. Iran threatened retaliation against all US bases if its energy sites are attacked. Anti-US protests erupt across Iranian cities.
Web Summary : ईरान ने होर्मुज जलडमरूमध्य पर ट्रम्प के अल्टीमेटम को खारिज कर दिया, और उनके प्रसिद्ध वाक्य 'यू आर फायर्ड!' का इस्तेमाल किया। ईरान ने धमकी दी कि अगर उसके ऊर्जा स्थलों पर हमला हुआ तो वह सभी अमेरिकी ठिकानों पर जवाबी कार्रवाई करेगा। ईरानी शहरों में अमेरिका विरोधी प्रदर्शन भड़क उठे।