शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 20:22 IST

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी आपल्या संभाव्य उत्तराधिकारी म्हणून तीन मौलवींची नावे पुढे केली आहेत

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी आपल्या संभाव्य उत्तराधिकारी म्हणून तीन मौलवींची नावे पुढे केली आहेत. मात्र, या तिघांची ओळख अद्याप उघड करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे, या शर्यतीत खामेनेई यांच्या मुलाचा समावेश नाही, हे यातून स्पष्ट झाले आहे.

इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष तीव्र होत असताना, इस्रायलच्या संरक्षण दलांकडून इराणचे मोठे लष्करी अधिकारी आणि प्रमुख व्यक्तींना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. अशा परिस्थितीत, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई आपल्या उत्तराधिकारी निवडण्याबाबत गांभीर्याने विचार करत असल्याचे वृत्त समोर आले आहे.

खामेनेईंनंतर सर्वोच्च नेतेपदाची सूत्रे कोण सांभाळणार?येरुशलेम पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, द न्यूयॉर्क टाइम्सने शनिवारी आपल्या एका अहवालात दावा केला आहे की, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी तीन वरिष्ठ मौलवींची नावे आपले उत्तराधिकारी म्हणून पुढे केली आहेत. इस्रायलसोबत सुरू असलेल्या संघर्षादरम्यान जर त्यांची हत्या झाली, तर अशा स्थितीत त्या तिघांपैकी एक जण त्यांचे पदभार सांभाळेल.

खामेनेईंनी उत्तराधिकारी निवडणाऱ्या सभेला दिली नावेअहवालानुसार, खामेनेईंनी इराणच्या सर्वोच्च नेता निवडणाऱ्या तज्ज्ञ मौलवींच्या सभेला निर्देश दिले आहेत की, त्यांनी दिलेल्या तीन नावांपैकी कोणत्याही एकाला ते आपला उत्तराधिकारी म्हणून निवडू शकतात.

खामेनेई सुरक्षित स्थळीखामेनेई आता एका सुरक्षित भूमिगत ठिकाणाहून कामकाज करत आहेत आणि एका विश्वासू सहकाऱ्यामार्फत सगळ्यांशी संवाद साधत आहेत. त्यांनी केवळ आपल्या संभाव्य उत्तराधिकाऱ्यांची नावेच दिली नाहीत, तर वरिष्ठ कमांडर्स मारले गेल्यास महत्त्वाच्या लष्करी पदांसाठी बॅकअपचीही घोषणा केली आहे.

तीन मौलवींमध्ये खामेनेईंच्या मुलाचे नाव नाही!अहवालात असेही म्हटले आहे की, अयातुल्ला खामेनेई यांचा मुलगा मोजतबा, जो स्वतः एक मौलवी आहे आणि इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्सच्या जवळचा मानला जातो. पण, खामेनेईंचा उत्तराधिकारी म्हणून त्याचे नाव देण्यात आलेले नाही. या पदासाठी तो आघाडीवर असल्याची चर्चा होती.

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलwarयुद्ध