शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

इराणचा अमेरिकन बेसवर महाभयंकर हल्ला! अमेरिकेच्या क्षेपणास्त्रांचे स्फोटांवर स्फोट थांबेनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 02:25 IST

Iran strikes US Base Iraq drone attack: इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने रविवारी मोठ्या प्रमाणावर हल्ले केले. रियाध, दुबई, अबू धाबी, दोहा, मनामा, यरुशलम आणि तेल अवीव या शहरांमध्ये भीषण स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. या हल्ल्यांमध्ये इस्रायलमध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आहे. 

तेहरान/तेल अवीव: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनेई यांच्या मृत्यूनंतर पश्चिम आशियात युद्धाचा वणवा अधिकच भडकला आहे. इराणने रविवारी रात्रीपासून 'युद्धाचा नवा टप्पा' जाहीर करत इस्रायल आणि शेजारील देशांतील अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडला आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांनी खमेनेईंच्या हत्येला 'मुस्लिम जगाविरुद्धचे युद्ध' घोषित केले आहे.

इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने रविवारी मोठ्या प्रमाणावर हल्ले केले. रियाध, दुबई, अबू धाबी, दोहा, मनामा, यरुशलम आणि तेल अवीव या शहरांमध्ये भीषण स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. या हल्ल्यांमध्ये इस्रायलमध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आहे. 

इराकमधील अमेरिकन तळावर ड्रोन हल्लाइराणने इराक मधील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य करत आत्मघातकी ड्रोन डागले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्याला न जुमानता इराणने 'सेल्फ-डिफेंस' (स्वसंरक्षण) च्या नावाखाली हे हल्ले सुरू ठेवले आहेत. इराणच्या एका आत्मघातकी ड्रोनने इराकच्या इरबिल येथील अमेरिकन लष्करी तळावरील दारूगोळा कोठाराला थेट लक्ष्य केले. या हल्ल्यामुळे तळावर साठवलेल्या स्फोटकांचे एकामागून एक भीषण स्फोट झाले असून संपूर्ण परिसरात आगीचे मोठे लोळ पाहायला मिळत आहेत.

खामेनेईंच्या मृत्यूचा बदलाखामेनेई यांची हत्या हा एक अक्षम्य गुन्हा आहे आणि त्याचा बदला घेणे हे इराणचे कर्तव्य आहे," असे प्रतिपादन राष्ट्राध्यक्ष पेजेशकियन यांनी केले आहे. इराणने आता जमीन आणि समुद्र अशा दोन्ही आघाड्यांवर हल्ले तीव्र करण्याची घोषणा केली आहे. इराणच्या लष्करी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, त्यांच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराला आता कोणतीही सीमा उरलेली नाही. संपूर्ण आखाती क्षेत्रात आता दहशतीचे वातावरण आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran Attacks US Bases After Khamenei's Death, Escalating Middle East Conflict

Web Summary : Following Ayatollah Khamenei's death, Iran launched missile attacks on US bases and Israeli cities, claiming retaliation for a 'war against Muslims.' Explosions rocked Riyadh, Dubai, and Jerusalem. An Iranian drone struck a US base in Iraq, triggering massive explosions and fires. Iran vows intensified attacks.
टॅग्स :IranइराणAmericaअमेरिकाIsraelइस्रायलwarयुद्ध