शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
2
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
3
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
4
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
5
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
6
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
7
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
8
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
9
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
10
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
11
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
12
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
13
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
14
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
15
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
16
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
17
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
18
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
19
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
20
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
Daily Top 2Weekly Top 5

इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 20:00 IST

इलॉन मस्कची इंटरनेट कंपनी स्टारलिंकवर बंदी घालण्यासाठी इराणने एक नवा कायदा बनवला आहे.

इराण आणि इस्त्राईलमध्ये युद्धविराम झाला असला तरी, इराणच्या मनात अजूनही भीती कायम आहे. इराणला अजूनही हेरगिरीचा धोका जाणवत असल्याने इराणने एक नवा फतवा जारी केला आहे. यानुसार, जर देशात कोणीही इलॉन मस्कच्या स्टारलिंक सॅटेलाईट इंटरनेट सेवेचा वापर केला, तर त्याला चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा दिली जाईल. याशिवाय त्याला दंड भरावा लागेल आणि तुरुंगातही जावे लागू शकते.

अलीकडेच इराणच्या संसदेने अमेरिकन कंपनी स्टारलिंकच्या सॅटेलाईट इंटरनेट सेवेवर बंदी घालण्यासाठी मतदान केले. अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जात आहे. हेरगिरीचे नियम अधिक कडक करण्यासाठी इराणने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. इराणचे मत आहे की, इंटरनेट ब्लॅकआउट (Internet Blackout) दरम्यान, स्टारलिंक डिजिटल लाईफलाईन म्हणून महत्त्वाची भूमिका बजावू शकते, ज्यामुळे पश्चिमेकडील देशांशी त्यांचे माहिती तंत्रज्ञान विकसित होऊन तेहरानच्या चिंता वाढू शकतात.

इराणच्या दृष्टीने स्टारलिंक म्हणजे धोका!अमेरिकन इंटरनेट कंपनी स्टारलिंकवर लावलेली बंदी या गोष्टीचा पुरावा आहे की, ही कंपनी जागतिक संघर्षांमध्ये कशी गुंतली आहे. अमेरिका आणि इस्त्रायली हल्ल्यांनंतर, इराणचे हे पाऊल यावर प्रकाश टाकते की, सॅटेलाईट इंटरनेट आता आधुनिक युद्धाचे एक साधन बनले आहे. त्यामुळे इराणच्या दृष्टीनेही हे धोकादायक बनले आहे.

इराणने बनवला नवा कायदामस्कच्या इंटरनेट कंपनी स्टारलिंकवर बंदी घालण्यासाठी इराणने एक नवा कायदा बनवला आहे. यात स्टारलिंक वापरणाऱ्यांना गुन्हेगार ठरवण्यासोबतच, या कायद्यात हेरगिरीसाठीही शिक्षेची तरतूद आहे. याशिवाय, या कायद्यात अमेरिका आणि इस्त्राईलसारख्या देशांसाठी हेरगिरी करणाऱ्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याचीही तरतूद आहे. सायबर हल्ले, ड्रोन आणि इतर हानिकारक शस्त्रांचा वापर, परदेशी गुप्तचर संस्थांकडून निधी स्वीकारणे यांसारख्या कृत्यांसाठीही शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

इराणमध्ये स्टारलिंकमुळे का खळबळ?इस्त्राईलने इराणवर हवाई हल्ले केल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी इलॉन मस्कने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ‘बीम चालू आहे’ (Beam is on) असा संदेश पोस्ट केला होता. याचा सरळ अर्थ असा होता की, इराणने इंटरनेट ब्लॅकआउट केला असला तरी, स्टारलिंकचे सॅटेलाईट इंटरनेट सुरू होते. तेहरानने इस्त्राईलच्या हल्ल्यांनंतर लगेचच डिजिटल संप्रेषण खंडित केले होते. असे असूनही स्टारलिंकचे इंटरनेट सुरू राहिल्याने इराणची ही बंदी कुचकामी ठरली.

इराणमध्ये ७०० हून अधिक लोकांना ताब्यातइस्त्राईलच्या हल्ल्यांनंतर इराणने गेल्या आठवड्यात मोहीम राबवून अमेरिका आणि इस्त्राईलसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली ७०० हून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे. इराणच्या सरकारी मीडियानुसार, यापैकी किमान ६ लोकांना फाशी देण्यात आली आहे, ज्यात तीन कुर्द नागरिकही सामील आहेत. यांच्यावर इस्त्राईलच्या गुप्तचर संस्था मोसादला (Mossad) मदत केल्याचा आरोप आहे. याशिवाय, इराणने संवेदनशील ठिकाणांचे व्हिडिओ बनवल्याच्या आरोपाखाली ५३ लोकांनाही अटक केली आहे.

टॅग्स :Iranइराणelon muskएलन रीव्ह मस्कInternetइंटरनेट