शहरं
Join us  
Trending Stories
1
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
2
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
3
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
4
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
5
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
6
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
7
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
8
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
9
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
10
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
11
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
12
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
13
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
14
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
15
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
16
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
17
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
18
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!
19
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
20
रोकड, सोनंनाणं आणि..., निवृत्त अबकारी अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड    

इराणनं आपल्या चलनातून ४ शून्य हटवले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 07:40 IST

इराणमधली गरिबी दर ३५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. इराणमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून महागाईचा दर ३० ते ४० टक्क्यांपेक्षा जास्त राहिला आहे.

इराणमध्ये गरिबी आणि महागाई आकाशाला भिडली आहे. लोकांच्या अक्षरश: जगण्या-मरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात अमेरिकेनं त्यांच्यावर अनेक निर्बंध लादले आहेत. चलनाच्या अवमूल्यनानंही तळ गाठला आहे. देशातील ही गरिबी आणि महागाई कमी करायची तर त्यासाठी काय करायचं? इराणनं त्यासाठी यंदा एक वेगळाच उपाय योजला आहे. इराणनं त्यासाठी आपलं चलन ‘रियाल’मधून चार शून्य हटवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे काय? साध्या भाषेत सांगायचं झालं तर आता १०,००० रियालची किंमत फक्त १ रियाल असेल! या निर्णयाला इराणी संसदेनंही मंजुरी दिलीय. हा बदल दोन वर्षांनंतर लागू होणार आहे.

इराणमधली गरिबी दर ३५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. इराणमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून महागाईचा दर ३० ते ४० टक्क्यांपेक्षा जास्त राहिला आहे. त्यामुळे बिल, बँक स्टेटमेंट आणि खरेदी-विक्रीचे व्यवहार यात मोठमोठे आकडे वापरावे लागतात, ज्यामुळे व्यवहार गुंतागुंतीचे होतात. सरकारचं म्हणणं आहे, मोठ्या नोटांची छपाई आणि हाताळणी खर्चिक असल्यामुळे हा बदल केल्याने प्रिंटिंग आणि लॉजिस्टिक्स स्वस्त होतील. चलनाला बळकटी मिळेल, रियालची स्थिती थोडी सुधारेल. व्यवहार सोपे होतील. उदाहरणार्थ, जर एखादी वस्तू दहा लाख रियालला मिळत असेल, तर बदलानंतर तीच वस्तू १०० रियालमध्ये मिळेल! मात्र, या बदलाचा महागाईवर थेट परिणाम होणार नाही, कारण हा फक्त चलनाच्या अंकांमध्ये बदल आहे, मूल्य तेच राहणार आहे. जर महागाईवर नियंत्रण ठेवण्यात आलं नाही, तर रियालचं मूल्य पुन्हा घसरेल.

बँकिंग आणि डिजिटल पेमेंट्समध्ये मोठे आकडे वापरावे लागत असल्याने येणाऱ्या अडचणी कमी होतील. यामुळे तांत्रिक आणि लेखापद्धती सुलभ होईल. लहान आकडे असल्याने लोकांना चलनाचं मूल्य समजणं सोपं जाईल. हा एक मानसिक परिणाम आहे, जो लोकांच्या खरेदीवृत्ती आणि नियोजनावर परिणामकारक ठरु शकेल.इराणचा जगाशी व्यापार आणि संबंध तणावपूर्ण राहिले आहेत. १९७९च्या इस्लामिक क्रांतीनंतरपासून अर्थव्यवस्थेत अनेक आव्हानं आली. आयात जास्त आणि निर्यात कमी असल्यामुळे महागाई सतत वाढत गेली आणि रियालचं मूल्य घसरत राहिलं.२०२३मध्ये परिस्थिती इतकी बिकट झाली की महागाईनं रियालच्या अवमूल्यनालाही मागे टाकलं. अमेरिका आणि युरोपसोबतचे संबंध तुटल्याने राजकीय एकटेपणानं अर्थव्यवस्था अधिक कमजोर केली आणि रियालचं मूल्य आणखी खाली गेलं. 

अमेरिकेनं इराणच्या अणू कार्यक्रमांवर आणि सुरक्षेच्या कारणांमुळे कडक निर्बंध लादले आहेत. ट्रम्प प्रशासनानं ‘मॅक्सिमम प्रेशर’ धोरण अवलंबलं, ज्यात तेल निर्यात, बँकिंग आणि शिपिंगवर कठोर बंदी घालण्यात आली. ईराणी तेल खरेदी करणाऱ्या कंपन्यांनाही दंडित केलं गेलं. यामुळे परदेशी बँक व्यवहार कठीण झाले. डॉलर आणि युरोचं आगमन कमी झालं, आयात महाग आणि मर्यादित झाली. परिणामी गुंतवणूक आणि व्यापारावर पुन्हा विपरीत परिणाम झाला.इराणकडे जगातला चौथा सर्वांत मोठा तेलसाठा आहे, पण तेलाची निर्यातही घटल्यानं ना घरका, ना घाटका अशी स्थिती झाल्यानं इराणनं शेवटी आपल्या चलनातून चार शून्य कमी केली आहेत!

English
हिंदी सारांश
Web Title : Iran Removes Four Zeros From Its Currency: A Summary

Web Summary : Iran has removed four zeros from its currency, the Rial, to combat high inflation and simplify transactions. The move, approved by parliament, aims to make the currency stronger and ease financial burdens amid economic challenges and international sanctions.
टॅग्स :Iranइराण