शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 19:03 IST

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, एनपीटीमधून बाहेर पडण्यासंदर्भात इराणी संसदेने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. तर, हा प्रस्ताव कायदेशीर प्रक्रियेच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे, असे एका खासदाराने म्हटले आहे.

मध्यपूर्वेत इराण आणि इस्रायल यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. यातच, इराणी संसद अण्वस्त्र प्रसारबंदी करार अर्थात 'एनपीटी'मधून बाहेर पडण्यासाठी एक विधेयक तयार करत आहे, असे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी (१६ जून २०२५) सांगिलते. मात्र, आम्ही अण्वस्त्रे बनवण्याच्या बाजूने नाही, असे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बाघई  यांनी स्पष्ट केले आहे.

सुरुवातीच्या टप्प्यावर आहे कायदेशीर प्रक्रिया -रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, एनपीटीमधून बाहेर पडण्यासंदर्भात इराणी संसदेने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. तर, हा प्रस्ताव कायदेशीर प्रक्रियेच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे, असे एका खासदाराने म्हटले आहे.

गेल्या आठवड्यात, तेहरान अणुबॉम्ब बनवण्याच्या मार्गावर आहे, असे इराणने म्हटले होते. याशिवाय, आपला अणुकार्यक्रम शांततापूर्ण आहे, असेही इराण नेहमीच म्हणत असतो. दरम्यान, तेहरान त्यांच्या एनपीटी दायित्वांचे उल्लंघन करत आहे, असे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने (आयएईए) गेल्या आठवड्यातच, म्हटले आहे.इस्रायलचा इराणला इशारा -खरेतर, इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे या भागात युद्धाची भीती वाढली असतानाच हे पाऊल उचलण्यात आले आहे. दरम्यान, इस्रायलने इराणी शस्त्रास्त्र आस्थापनांजवळ राहणाऱ्या लोकांना त्यांचे तळ रिकामे करण्याचा इशारा दिला आहे.

काय आहे NPT? -अण्वस्त्र प्रसारबंदी करार (एनपीटी) हा अण्वस्त्रे आणि संबंधित तंत्रज्ञानाचा प्रसार रोखण्यासाठी आणि अणु उर्जेच्या शांततापूर्ण वापरात सहकार्याला प्रोत्साहन देण्यासारखे उद्दीष्ट साध्य करण्यासाठीचा आंतरराष्ट्रीय करार आहे.

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलwarयुद्ध